आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या शिजियांगमध्ये नागरिकांचे पासपोर्ट जप्त, मुस्लिमबहुल असल्याने नवे धोरण लागू करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - शिजियांग या मुस्लिमबहुल राज्यातील सर्व नागरिकांनी सरकारकडे पासपोर्ट जमा करावेत, असे आदेश चीन सरकारने दिले. सुरक्षेच्या कारणास्तव हे आदेश दिल्याचे सांगण्यात आले आहे. सामाजिक सुरक्षा धोक्यात आल्याचा सरकारला संशय असून यासाठी मुस्लिम कट्टरवादी जबाबदार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. शिजियांगमधील नागरिकांनी परदेश गमन करू नये, असे आदेश सरकारने दिले आहेत. वायव्य शिजियांगमध्ये उईघुर मुस्लिमांचे प्रमाण अधिक आहे. येथील पासपोर्टसंबंधीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकाच्या आेळखपत्रांची छाननी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी आपले पासपोर्ट पोलिस स्टेशनमध्ये सादर करावेत, असे आदेश आहेत. आकसू शहरातील नागरिकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येत आहे. उईघुर व तुर्की भाषिक मुस्लिमांच्या स्थलांतराचा तपशील यामुळे ठेवला जाईल. सिरिया व इराकमध्ये अनेक उईघुर मुस्लिम जात असल्याचेही माध्यमांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...