आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy Over Inviting Jailed Model As Chief Guest

PHOTOS तुरुंगवास भोगलेल्या सुपर मॉडेलला चीफ गेस्ट म्हणून बोलावल्याने वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अयान अलीबरोबर सेल्फी काढणारे विद्यार्थी. - Divya Marathi
अयान अलीबरोबर सेल्फी काढणारे विद्यार्थी.
कराची - बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर सुटलेली पाकिस्तानची सुपर मॉडेल अयान अलीला युनिव्हर्सिटी ऑफ कराचीमध्ये एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावल्याने वाद सुरू झाला आहे. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमानंतर त्याचे फोटो सोशल मिडियावर आल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर लोकांनी मनी लॉँडरींगच्या आरोपीला चीफ गेस्ट बनवल्याच्या मुद्यावरून युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे गुरुवारी #AyanBaniUstani टॉप ट्रेन्डिंग मध्ये होते.

प्रकरण काय...
अयान अलीला डिपार्टमेंट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या दोन विद्यार्थी आणि उद्योगपती अरब खान आणि अब्दुल्ला रिझवान शेख यांच्या प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी बोलावले होते. हा प्रोजेक्ट शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांना मदत करण्याच्या संदर्भातील आहे. अयान याठिकाणी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थित होती. विद्यार्थ्यांमध्ये तिच्याबरोबर फोटो काढण्याची एकच स्पर्धा सुरू झाली होती. अनेकांनी या मॉडेलबरोबर सेल्फी घेतले. नंतर अयानने कार्यक्रमाचे फोटो आणि तिचे अनुभव फेसबूकवर शेअरही केले. लोकांनी याप्रकरणी राग व्यक्त केल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अयानला परवानगीशिवाय का निमंत्रित करण्यात आले अशी विचारणा त्यांना करण्यात आली.

कोण आहे अयान अली...
दुबईत जन्मलेली 21 वर्षीय अयान अली पाकिस्तानच्या मॉडेलिंग जगात चांगलीच प्रसिद्ध आहे. विकीपीडियातील माहितीनुसार ती अॅक्ट्रेस, प्रोड्यूसर, सिंगर आणि साँग राइटरही आहे. जुलै महिन्यातच तिची जामिनावर सुटका झाली आहे. तिच्यावर मनी लाँडरींगचा आरोप आहे. सरकारी वकिलांच्या मते मार्च महिन्यामध्ये सुटकेसमध्ये पाच लाख डॉलर गेऊन जाताना तिला इस्लामाबाद एअरपोर्टवर पकडण्यात आले होते. पाकिस्तानमधून देशाबाहेर केवळ जास्तीत जास्त 10 हजार डॉलर एवढीच रक्कम नेण्याची परवानगी आहे. आरोप सिद्ध झाल्यास तिला 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

टि्वटरील निवडक प्रतिक्रिया...
@JalilMaqsood
Ayyan Ali, gave Lecture in #KU, about hiding places in suitcase, money laundering 10 basics and how to be wedded to a politician
@sheenasoomro
Down with #KarachiUniversity for having an accused in money laundering case #AyyanAli as guest of honour huh#KU #AyyanBaniUstani
@EmanHosaiin
Ayyan Ali invited as guest by KU; in other words, sky is blue in Pakistan.#AyanBaniUstani
@RashidEdD
KU teachers had selfies with Ayyan Ali. Such a disgrace for the profession. I wanna quit my job, don't wanna be a university teacher :(:(:(
@smasood800
"#AyyanAli visits #KU as chief guest"... Please KU, have some standards.. PLEASE!
@smasood800
Ayyan Ali lecturing Karachi University on what, Money Laundering? KU has serious ties with politicians and their toys. #AyanBaniUstani
पुढील स्लाइज्सवर पाहा, युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमातील आणि अयानचे इतर PHOTOS