आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्तर बलुच यांनी शेअर केलेला पाक पोलिसांच्या क्रूरतेचे VIDEO व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वेगळ्या बलुचिस्तानची मागणी करणारे नेते अख्तर बलुच यांनी पाकिस्तानी पोलिसांच्या क्रूरतेचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी शेअर केला होता. पाकिस्तानमध्ये भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे, की पाकिस्तानी लष्कराचा खरा दहशतवाद बघा. कराचीत अशा प्रकारे एका निरपराध तरुणाला गोळ्या घालण्यात आल्या.
काय आहे व्हिडिओत
या व्हिडिओत पाकिस्तानी लष्कराचे जवान एका तरुणाला अटक करताना दिसतात. तो त्याचा विरोध करतो तेव्हा जवान त्याच्या पायात गोळी घालतात. विशेष म्हणजे कराचीतील रस्त्यावर भरदिवसा ही घटना घडली होती. गोळी लागल्यावर या तरुणाच्या पायातून भळाभळा रक्त वाहते. तो रस्त्यावर कोसळतो. जीव वाचवण्यासाठी धडपड करतो. इकडे-तिकडे लोळतो. पण कुणीही त्याच्या मदतीसाठी पुढे येत नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पाकिस्तानी लष्कराचा खरा दहशतवाद... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...