आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमधील या गावात घरोघरी बनवतात जीवघेणे शस्त्रास्त्रे, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खैबर पख्‍तूख्‍वाच्या या गावात अँटी एअरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत सर्व शस्त्रे बनवले जातात. - Divya Marathi
खैबर पख्‍तूख्‍वाच्या या गावात अँटी एअरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत सर्व शस्त्रे बनवले जातात.
असे कोणते बंदूक नसेल जे पाकिस्तानच्या दारा अदम खेल गावात मिळणार नाही. हे गाव खैबर पख्‍तूनख्‍वामधे आहे. येथील पूर्ण अर्थव्यवस्था अवैध शस्त्रांवर आधारित आहे. अँटी एअरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत...
- येथे शस्त्र बनवणारे इतके तरबेज आहेत ते अँटी-एअरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत सर्व बनवतात.
- शस्त्रे विकणा-यांचे म्हणणे आहे, की जगात असे कोणतेही हत्यार नाही, जे आम्ही बनवू शकणार नाही.
- तो म्हणतो, जर आम्हाला स्ट‍िंगर मिसाइलही दिले तर आम्ही त्याला बनवून टाकू की असली-नकलीमधील फरक करणे अवघड होऊन जाईल.
- यांनी जे शस्त्र कधी पाहिले नाही तेही केवळ 10 दिवसांमध्‍ये बनवू शकतात.
- एकदा शस्त्राची पहिली प्रतिकृती बनवल्यानंतर दुसरे फक्त 2-3 दिवस लागते.
- यांचे हत्यार भलेही खूप जूने असतील, मात्र यापासून बनवण्‍यात येणारे शस्त्र अस्सलच असते.
- अस्सल शस्त्राचे सीरियल क्रमांकही या अवैध शस्त्रांवर टाकले जाते.
शस्त्र काम करेल की नाही सांगता येत नाही
- हे शस्त्र ओरिजनल शस्त्रांप्रमाणे काम करतील याची गॅरंटी नाही.
- हाताने स्टीलपासून बनवलेले गन कॉम्प्युटराझ्ड मशीनमधून फॅक्टरीत बनवलेल्या बंदूकीशी मॅच करु शकत नाही.
- या शस्त्रांमध्‍ये काही गडबड झाली तर त्याचे पार्ट्स परत घेतले जात नाही. खराब झाल्यास ती फेकून द्यावी लागतात.
- दारामध्‍ये हा अवैध शस्त्रांचा उद्योग केव्हा सुरु झाला हे कोणालाही माहित नाही.
- 1857 मध्‍ये बंडखोरांनी ब्रिटिश लष्‍कराविरुध्‍द हा उद्योग सुरु केल्याचे सांगितले जाते.
- 1979 मध्‍ये रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यावर येथील शस्त्रांची मागणी वाढली.
गल्लीबोळात आहे दुकाने
- या गावाच्या गल्लीबोळात अशा प्रकारचे शस्त्र बनवणारे दुकाने आहेत.
- हे शस्त्रे जहाजातून आणलेल्या भंगार धातूंपासून बनवले जाते.
- ती बनवण्‍यासाठी फार मोठे उपकरण नसते. तर बारीक हँड टूल व ड्रिलचा वापर केला जातो.
- या गावातील 75 टक्के लोक अवैध शस्त्र बनवण्‍याचा उद्योग करतात.
- हा उद्योग एका पिढीपासून दुस-या पिढीकडे सोपवला जातो.
- यांना नेहमी अफगाणिस्तान व आसपासच्या भागात विकले जातात.

सरकारचाही होता पाठिंबा
- एकेकाळी सरकारचाही शस्त्रांच्या बाजारपेठेला पाठिंबा होता.
- 1988 मध्‍ये रावळपिंडीमध्ये शस्त्रांचा स्फोट झाला. या घटनेनंतर सरकारने शस्त्रांचे भंगार दाराच्या बंदूकवाल्यांना विकले होते.
- हे शस्त्रे मिळताच बंदूक बनवणा-याने एका रात्रीत त्यांचे तंत्रज्ञान शिकवून घेतले.
- यानंतर सरकारला वाटले, की दहशतवादी दारामध्‍ये बनवणा-या शस्त्रांचा वापर जेव्हा देशाच्या सैन्याविरुध्‍द करु लागले तेव्हा त्यांच्या बंदी घातली.
- मात्र येथील 2500 शस्त्रे बनवणा-यांनी सांगितले, की त्यांनाही आपले शस्त्रे दहशतवाद्यांना विकले नाही.
- दारा अदम खेल गावात आताही पाक सरकारचे कायदे लागू होत नाहीत. येथे आजही स्थानिक कायदे पाळले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा दारा अदमचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)