आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये उष्णतेची लाट, साडेचारशे जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील कराची व सिंध प्रांतात विविध जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या साडेचारशेवर पोहोचली आहे. गेल्या शनिवारी पाकमध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. कराचीमध्ये ४५ डिग्री सेल्सिअस तर सिंध प्रांतातील जाकोबाबाद, लरकना व सुक्कुर जिल्ह्यांमध्ये ४८ डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली.

अतिउष्णतेच्या या संकटाचा सामना करण्यासाठी येथील निमलष्करी दलांनी तातडीची मदत पुरविणारी केंद्रे सुरू केली आहेत. याचबरोबर, वीजपुरवठा कोलमडल्यामुळे कराचीमधील पाणी पुरवठ्यासही मोठा फटका बसला आहे.मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक, मुले व महिलांचा समावेश आहे. अनेकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, कराचीमध्ये सन ९ मे १९३८ नंतर प्रथमच पारा इतका चढला आहे.
बातम्या आणखी आहेत...