आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तान : इतिहासातील सर्वांत मोठे बाल लैंगिक शोषण उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात 280 बालकांचे लैंगिक शोषण झाल्‍याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, याच्‍या तब्‍बल 400 व्‍हीडिओ क्लिप सापडल्‍या आहेत. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. या चाइल्ड सेक्शुअल अब्यूज (बालकांवर लैंगिक अत्‍याचार) मुळे मानवतेला काळिमा फासली गेली. या प्रकरणाची थेट पाकिस्‍तान केंद्र सरकारने चौकशी करून दोषींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पा‍क व्‍याप्‍त पंजाबमधून होत आहे. दरम्‍यान, हा इतिहासातील सर्वांत मोठा बाल लैंगिक अत्‍याचार असल्‍याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्‍या पंजाब चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरोचे प्रमुख सबा सादिक यांनी दिली. 90 च्‍या दशकात पाकिस्तानमध्‍ये असेच एक प्रकरण उघडकीस आले होते. त्‍यावेळी लाहौरमध्‍ये 100 पेक्षा अधिक बालकांचा लैंगिक छळ करून त्‍यांची हत्‍या करण्‍यात आली होती.

पुढील स्‍लाइड्वर वाचा नेमके काय आहे प्रकरण....