आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांना आश्रय देऊ नका, पाकला ट्रम्प यांचा कडक इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांना मारण्यास पाकिस्तानने आश्रय दिलेले दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. प्राइम टाइमला प्रसारित झालेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानवर आरोप केला. अफगाणिस्तानातील स्थितीचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर आता दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तानातील सैन्य कुमक वाढवण्यात येईल, असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेच्या दक्षिण आशियातील धोरणात यामुळे नाट्यमयरीत्या बदल दिसून आला. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांचे पुनर्विलोकन आपण करत असून यात मूलभूत बदल करण्यात येतील, असे ट्रम्प म्हणाले. पाकमधील दहशतवाद पोषक वातावरणाविषयी यापुढे अमेरिका गप्प राहणार नाही. लवकरच यावर  कडक उपाय योजले जातील. हिजबुल मुजाहिदीन हा काश्मिरी गट जागतिक दहशतवादी गटांत समाविष्ट केल्यानंतर ट्रम्प यांनी पाकवर टीका केली आहे. परराष्ट्र सचिव रेक्स टिलर्सन यांनी हिजबुल व सय्यद सलाउद्दीनला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याची भूमिका घेतली होती.  
 
अफगाणिस्तानमध्ये यापुढे अमेरिका केवळ लष्करी धोरण राबवणार नाही, त्यासोबत राजनयिक व विकास धोरणही राबवेल, असे दक्षिण आशिया धोरणाच्या तज्ज्ञ निशा देसाई बिस्वाल यांनी सांगितले. भारत- अफगाणिस्तान संबंध हा विकास धोरणाचा महत्त्वाचा भाग असून अमेरिका यापुढे भारताची साथ घेईल.

भारताच्या अफगाण धोरणाची प्रशंसा
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आर्थिक धोरणांची आणि अफगाणिस्तानसोबत व्यापारी कराराच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. अफगाणिस्तानमध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी भारत रचनात्मक प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारत अमेरिकेचा महत्त्वाचा मित्र आहे, असे ट्रम्प म्हणाले.   
 
ट्रम्प यांच्या धोरणाचे स्वागत
काबूल- युद्धग्रस्त अफगाणिस्तानविषयी अमेरिकी धोरणातील बदलाचे स्वागत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी यांनी केले आहे. येथील सैन्य कुमक वाढवणे गरजेचे असल्याचे घणी म्हणाले. जागतिक स्तरावर अमेरिका नेहमीच अफगाणिस्तानची मदत करत आल्याचे घणी म्हणाले.  
 
अफगाणिस्तानचे स्मशान करू, तालिबान्यांची धमकी  
काबूल- तालिबानी गटाने अफगाणिस्तानला स्मशान करण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुमक वाढवण्याच्या निर्णयानंतर ही धमकी गटाने दिली. अमेरिकेने सैन्य दले कमी केली नाहीत तर अफगाणिस्तान केवळ स्मशानभूमीच ठरेल. तालिबानचा प्रवक्ता झाबीउल्लाह मुजाहिद याने म्हटले की, अमेरिकेची गच्छंतीच योग्य राहील. शेवटचा अमेरिकी सैनिक ठार करेपर्यंत हा जिहाद सुरू ठेवण्याचा निश्चय त्याने व्यक्त केला. दरम्यान, अफगाणिस्तानात ३,९०० सैन्य दले पाठवण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे.  

पुढील स्‍लाइडवर...चीन पाकिस्तानच्या पाठीशी सदैव राहील, चीनची भूमिका
बातम्या आणखी आहेत...