आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील ‘मदर तेरेसा’ डॉ. रुथ फाऊ यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानला आशिया खंडातील पहिले कुष्ठरोगमुक्त राष्ट्र बनवण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या जर्मनवंशीय डॉ. रुथ फाऊ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. पाकिस्तानातील ‘मदर तेरेसा’ म्हणून त्यांची ओळख होती. 

१९६० मध्ये त्या पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये आल्या होत्या. येथील कुष्ठरोग्यांची अवस्था पाहून त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. १९६२ मध्ये त्यांनी कराची शहरात मॅरी अॅडिलेड कुष्ठरोग निवारण केंद्राची स्थापना केली. गिलगिट, बाल्टिस्तानसह पाकिस्तानमधील ५० हजारांहून अधिक कुष्ठरोगग्रस्त कुटुंबांवर उपचार केला. त्यांच्या या नि:स्वार्थ सेवेमुळे जागतिक आरोग्य संघटनेने १९९६ मध्ये पाकिस्तानला कुष्ठरोगमुक्त घोषित केले. असा बहुमान मिळवणारा पाकिस्तान हा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. 
बातम्या आणखी आहेत...