आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक, अफगाणमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के, ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपाच्या धक्क्यानंतर पाकिस्तानमध्ये लोक रस्त्यावर आले - Divya Marathi
भूकंपाच्या धक्क्यानंतर पाकिस्तानमध्ये लोक रस्त्यावर आले
इस्लामाबाद - भारतासह अफगान व पाकिस्तानातही सोमवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. पाकच्या पेशावर, इस्लामाबाद, स्वात, चित्रल, व मानसराेवरासह अन्य शहरांत ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले.

यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अफगाणिस्तानातील अश्कशामपासून २२३ किलोमीटर खाली या भूकंपाचे केंद्र होते. हा भाग अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेलगत असून हिंदुकुश रेंजमध्ये येतो. यापूर्वी २००५ मध्ये हिंदुकुश रेंजमध्ये भूकंप आला होता. नेपाळ-सोलोमन द्वीपसमूहातही सोमवारी भूकंप आला. नेपाळमध्ये पहाटे ४ वाजेच्या सुमारास आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवली गेली. यात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. दरम्यान, सोलोमन द्वीपसमूहात आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ इतकी नोंदली गेली.
उत्तर अफगाणिनस्तानमध्ये आलेल्या भूकंपातही कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची माहिती नाही. यापूर्वी २०१३ मध्ये या भागात आलेल्या भूकंपात १३ नागरिकांचा मृत्यू तर मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते.