इस्लामाबाद (पाकिस्तान) - राजधानी इस्लामाबादमध्ये शुक्रवारी रात्री 1.59 वाजता 5.1 तीव्रतेच्या भूंकपाचे झटके जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यूएस जियोलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी इस्लामाबादपासासून 16 किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्वमध्ये 26 किलोमीटर खोल याचे केंद्र होते, अशी माहिती त्यांनी दिली.
नुकसानीचे वृत्त नाही
इस्लामाबादशिवाय पूर्व पंजाब आणि उत्तरी-पश्चिम खैबर पख्तूनख्वामध्येही भूकंपाचे झटके जाणवले. पाकिस्तान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी या भागांमध्ये नुकसानीचे वृत्त नाही.
2005 मध्ये झाले होते मोठे नुकसान
8 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यात तब्बल 73,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 35 लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झाले होते. 2013 मध्येही भूकंप झाला होता. त्यावेळी 370 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 100,000 लोक बेघर झाले होते.