आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight People Killed In Lahore, Tereek Claime Responsibility

लाहोरच्या पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, आठ ठार, TTP ने स्विकारली जबाबदारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: लाहोरमधील पोलिस लाइनच्या मुख्‍य गेटजवळ स्फोट झाला. एएफपी.)
लाहोर - लाहोरच्या पोलिस मुख्‍यालयावर आज (मंगळवारी) दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात आठ ठार तर बारा जण जखमी झाली आहेत. या हल्ल्याची जबाबदारी तेहरिके-ए-तालिबन पाकिस्तान(टीटीपी) या दहशतवादी संघटनेनी स्विकारली आहे.
टीटीपीची बंदी घातलेली जमातूल अहरर या गटाचे प्रवक्ते एहसानुल्ला एहसान यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले, की हा हल्ला तेहरिकेच्या छोट्या गटाने घडवून आणला आहे.
स्फोट लाहोरच्या किला गुज्जर सिंग भागातील पोलिस लाइनच्या मुख्‍य गेटजवळ घडवून आणण्‍यात आला. प्राथमिक वृत्तानुसार पार्किंगमध्‍ये असलेल्या गाडीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.
स्फोट झालेल्या ठिकाणाजवळ उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतली होती. पंजाबचे पोलिस महासंचालक मुस्ताक सुखेरा यांनी माध्‍यमांना सांगितले, की हल्ल्याचे लक्ष्‍य पोलिस वसाहत होती.परंतू बॉम्ब घडवून आणणारा रस्त्यात असतानाच स्फोट झाला.लष्‍कराने दहशतवाद्यांविरुध्‍द कारवाई सुरु केली आहे. त्यामुळेच हा स्फोट घडवून आणण्‍यात आला. आम्ही हल्लेखोराच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज वापर करणार आहोत,अशी माहिती सुखेरा यांनी दिली आहे.
पुढे पाहा लाहोरच्या हल्ल्याची भीषणता..