आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eyewitness Take U Turn In Benazir Bhutto Assassination Case

बेनझीर हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे घूमजाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानाच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्ताे या कारच्या सनरूफमधून बाहेर आल्या नसत्या, तर त्यांचे प्राण वाचले असते. दहशतवाद विरोधी न्यायालयाच्या (एटीसी) सुनावणीदरम्यान रावळपिंडीच्या तत्कालीन एसएसपी इम्तियाज यांनी ही साक्ष दिली आहे.
बेनझीर २७ डिसेंबर २००७ रोजी निवडणूक प्रचार सभेसाठी रावळपिंडीत होत्या. रॅलीदरम्यान त्या गाडीच्या सनरूफमधून जनतेला अभिवादन करण्यासाठी त्या बाहेर आल्या. त्या वेळी आत्मघातकी बॉम्बरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या व त्यानंतर स्फोट घडवून आणला. यात बेनझीर यांचा अंत झाला.

याप्रकरणी मुख्य साक्षीदार आणि तत्कालीन एसएसपी इम्तियाज यांची साक्ष महत्त्वाची आहे. मात्र, या वेळी त्यांनी घूमजाव केले. सुरक्षेत कमतरता हे बेनझीर यांच्या हत्येचे कारण असल्याचे त्यांनी पूर्वीच्या जबाबात म्हटले होते. घटनास्थळी तैनात पोलिस अधिकारी सऊद अजीज व इतर अधिकारी सतर्क नसल्याने बेनझीर भुट्टोंचा मृत्यू आेढवल्याची साक्ष इम्तियाज यांनी दिली होती. मात्र, या वेळी त्यांनी एटीसी न्यायाधीश राय महंमद अयुब यांच्यासमोर पूर्वीपेक्षा वेगळीच साक्ष नोंदवली. कडेकोट सुरक्षा असल्याचे ते म्हणाले.