आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मुलीसाठी फेसबुक मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- बॉलीवूडचा ‘बजरंगी भाईजान’ भलेही रुपेरी पडद्यावरील काल्पनिक कहाणी असेल. परंतु गेल्या १३ वर्षांपासून कराचीत राहणाऱ्या भारतीय मुलीशी ती जुळणारी आहे. ती मूकबधिर असून अद्यापही तिला भारतातील आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्यासाठी फेसबुकवर मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ही हकिगत आहे गीता नावाच्या २३ वर्षांच्या तरुणीची. तिने १३ वर्षांपूर्वी अजाणतेपणी पाकिस्तानी प्रदेशात प्रवेश केला होता. अर्थातच तिचे वय त्यावेळी केवळ १० वर्षे होते. पंजाब रेंजर्सनी तिला आणले. ती कराचीतील इधी फाउंडेशनमध्ये राहते.
बातम्या आणखी आहेत...