आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठा बॉम्ब, हवेत स्फोट घडवून केले जाते शत्रूपक्षाचे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 हजार किलो वजनाचा नॉन न्यूक्लियर बॉम्ब GBU-43.... - Divya Marathi
10 हजार किलो वजनाचा नॉन न्यूक्लियर बॉम्ब GBU-43....
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेने अफगाणिस्तानातील इसिसच्या तळावर जगातील सर्वात मोठा 10 हजार किलोचा नॉन न्यूक्लियर बॉम्ब GBU-43 गुरूवारी रात्री फोडला. अमेरिकेने 2003 मध्ये हा एमओएबी, म्हणजेच मदर ऑफ ऑल बम बनवला होता. तेव्हा इराक युद्ध सुरु होते. मात्र, त्यावेळी त्याचा वापर केला नव्हता. गुरुवारी पहिल्यांदाच अमेरिकेने त्याचा वापर केला. 9 आठवड्यात तयार केला हा बॉम्ब...
 
इराक वॉर दरम्यान अमेरिकन एक्सपर्टनी याला केवळ 9 आठवड्यात तयार केला होता. त्यावेळी त्यांनी असे 15 बॉम्ब बनवले होते.
- पहिली टेस्ट फायर 11 मार्च 2003 रोजी फ्लोरिडात केली गेली. मात्र, त्याचा वापर केला गेला नव्हता. 
- त्यावेळी अमेरिकेने इराणवर एमओएबीचा हल्ला करण्याची तयारी केली होती.
- आता 14 वर्षानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात याचा वापर केला आहे.
- अफगाणिस्तानात अमेरिकी सेनेच्या कारवाईला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच तेथून अमेरिकन जवानांनी एक-एक असे बाहेर काढले जात आहे. 
 
एका बॉम्बची किंमत 103 कोटी रूपये.

वजन: 10 हजार किलो 
लांबी: 9 मीटर
रूंदी: 1 मीटर 
किंमत: 103 कोटी रुपये 
स्फोटके: 11 टन एच-6, टीएनटी आणि अॅल्युमिनियम 
रेंज: डागल्या जाणा-या ठिकाणापासून 1.5 मैलापर्यंत नुकसान पोहचवते.
 
सॅटेलाइटद्वारे कंट्रोल केला जातो हा बॉम्ब-
 
- या बॉम्बमध्ये एक ग्रिड असते जो फोल्ड होतो. त्यामुळे त्याची साईज छोटी होते आणि त्याला विमानात ठेवता येते. 
- तो एका पॅलेटद्वारे काम करतो, पॅलेटला पॅराशूटद्वारे खाली खेचले जाते ज्यामुळे हा बॉम्ब विमानातून सहज बाहेर येतो. 
- नंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे होते जेणेकरून हा बॉम्ब अचून लक्ष्यावर भेद करेल. या बॉम्बचा जमिनीपासून 1.8 मीटर उंचीवर स्फोट होतो. याचा हवेत स्फोट यासाठी केला जातो जेणेकरून जास्तीत जास्त नुकसान व्हावे.
- या बॉम्बचा आकार इतढा मोठा असतो त्यामुळे फायटर प्लेन ऐवजी तो सी-130 कार्गो विमानातून फेकला जातो. 
- त्याचा कव्हर(पडदा) अॅल्युमिनियमपासून बनवलेला असतो. त्याचमुळे या स्फोटात मोठे
नुकसान करता येते.
 
अमेरिकेला उत्तर देण्यासाठी रशियाने बनवला होता ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’

- अमेरिकेच्या या घातक बॉम्बला उत्तर देण्याची तयारी असावी म्हणून रशियाने एमओएबीपेक्षा 4 पट ताकदीचा बॉम्ब बनवला होता. याला फॉदर ऑफ ऑल बॉम्ब म्हटले गेले. मात्र, याचा अद्याप वापर केला गेला नाही. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा असतो घातक एमओएबी बॉम्ब... 
बातम्या आणखी आहेत...