आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुमन ऑन व्हिल्स: लाहोरच्या रस्त्यांवर जेव्हा बाइक घेऊन निघाल्या 150 महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर अचानक 150 मोटारसायकल धावल्या आणि उभी राहिली. जीन्स आणि चमकणारे जॅकेट परिधान केलेल्या मोटारसायकल स्वारांनी पांढरे हेल्मेट हटवले, तर प्रत्येकांची नजर त्यांच्याकडे खिळून राहिली. त्या सर्व महिला होत्या. 'वुमन ऑन व्हिल्स' या मोहिमे अंतर्गत प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या महिला एका रॅलीत सामील होण्‍यासाठी आल्या होत्या.
या अडथळ्यांमुळे परिवर्तनाची सुरुवात...
या मोहिमेचा भाग बनलेली 22 वर्षांची तैयबा तारिक आणि तिच्या सारख्‍या इतर तरुणींनी पुरुषांनी घालून दिलेल्या मर्यादा तोडण्‍याचा प्रयत्न करीत आहेत. दररोज अनेक अडथळे पार करुन बस पकडणे.
मोहिमेचा असा झाला जन्म...
पुरुषांच्या दमनशाही वृत्तीतून या मोहिमेची सुरुवात झाली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पंजाब सरकारने नोव्हेंबर महिन्यात 'वुमन ऑन व्हील्स' ही मोहिम सुरु केली. पहिला टप्पा रविवारी पूर्ण झाला. यात 150 महिला/ युवतींना प्रशिक्षण दिले. 1 हजार गुलाबी मोटारसायकल/स्कूटर विद्यार्थींनी आणि काम करणा-या महिलांनी कमी किंमतींमध्‍ये दिले जातील.
बदल...
मुली मोटारसायकल चालवयास शिकल्या तर त्या स्वातंत्रपणे फिरता येऊ शकते, असे तैयबा ला वाटते. नुकतेच 150 महिलांना मोटारसायकल चालवायला शिकवले आहे, असे ट्राफिक पोलिस अधिकारी सज्जाद मेहदी यांनी सांगितले. अनेक महिलांनी स्वत:च चालवायला शिकल्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लाहोरमध्‍ये झालेल्या महिलांच्या मोटारसायकल रॅलीची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...