आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मगुरूसह पाच जणांना पाकमध्ये फाशीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - ईशनिंदेच्या आरोपावरून एका ख्रिश्चन दांपत्याला जिवंत जाळल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या धर्मगुरूसह पाच जणांना पाकिस्तानच्या एका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इतर आठ दोषींना प्रत्येकी दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश चौधरी मोहम्मद आझम यांनी हा निकाल दिला. दोन वर्षांपूर्वी शाहजाह आणि शमा यांच्यावर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला होता. दोषींनी मशिदीत घोषणा करून गर्दी जमवली. जमावाने आधी या दांपत्याला मारहाण केली आणि नंतर विटांच्या भट्टीत फेकून दिले होते.
बातम्या आणखी आहेत...