आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पुराचे तांडव; मृतांची संख्या १६६ वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेल्या दुर्घटनांत किमान १६६ जणांचा मृत्यू झाला तर लाखो नागरिकांना आपले घर, गाव सोडून निवाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे.

देशातील महत्वाच्या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेकडो गावांना पाण्याने वेढा दिला आहे. खैबर पख्तुनख्वामध्ये ७९, पंजाब-४२, पाकव्याप्त काश्मीर- २३, बलुचिस्तान-१३, गिलगिट-बाल्टिस्तान-०७ नागरिकांचा मृत्यू झाला. इतर प्रांतात १२८ नागरिक जखमी झाले आहेत. लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणा पीडितांना सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचे काम युद्धपातळीवर करू लागले आहेत. पूर पीडितांना अन्नाची पाकिटे पुरवण्यात आली आहेत. आतापर्यंत ४१ हजार टन अन्नाची पाकिटे वितरित करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सध्या काही प्रदेशात पाऊस थांबला असला तरी पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वास्तविक पाकिस्तानात जुलैच्या मध्यावर मान्सूनचे आगमन होते व ऑगस्टच्या अखेरीस तो परततो. परंतु दरवर्षी देशात पावसामुळे अनेक बळी जातात. गेल्या वर्षी सुमारे ४०० नागरिकांचा बळी गेला होता. त्याचबरोबर हजारो एकर जमिनीवरील पीक भुईसपाट झाले होते. लष्कराने तातडीने बचाव मोहिम हाती घेतल्याने मोठी प्राण हानी टळली.