आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पुराने हाहाकार; ११६ जणांचा मृत्यू, हजारो लोक बेघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निम्म्या भारतात दुष्काळासारखी स्थिती असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसाने देशातील नद्यांना पूर आला असून ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुराचा फटका सुमारे ७ लाख लोकांना बसला. - Divya Marathi
निम्म्या भारतात दुष्काळासारखी स्थिती असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसाने देशातील नद्यांना पूर आला असून ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुराचा फटका सुमारे ७ लाख लोकांना बसला.
इस्लामाबाद- निम्म्या भारतात दुष्काळासारखी स्थिती असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसाने देशातील नद्यांना पूर आला असून ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुराचा फटका सुमारे ७ लाख लोकांना बसला.

देशातील सर्वच राज्यांत अस्मानी संकट आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुराचा फटका ७ लाख ५२ हजार नागरिकांना बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. लष्कर, एनजीआे व इतर संस्थांच्या मदतीने पीडितांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु पाऊस सतत राहिल्यास देशाची स्थिती आणखीनच वाईट होईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. खैबर पख्तुनख्वा-५९, पंजाब-२२, पाकव्याप्त काश्मीर-१०, बलुचिस्तान आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे झालेल्या अनेक दुर्घटनांत किमान ६१ नागरिक जखमी झाले आहेत. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये अनुक्रमे २६ आणि २४ नागरिकांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या पावसाने पाकिस्तानातील अनेक भागात धुमशान घातल्याचे पाहायला मिळू लागले आहे. पाकिस्तान सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेतल्याचे दिसून येते.
१७५ हून अधिक गावांना पुराचा वेढा
४,५०,००० सुरक्षित स्थळी हलवले
२,७४७ घरांचे विविध राज्यांत नुकसान
२ हजार सुखरूप बाहेर
गेल्या आठवड्यात सिंध प्रांतात पावसामुळे अनेक गावांत २ हजार २७५ नागरिक अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाने ऑपरेशन यशस्वीपणे राबवले होते. त्यामुळे नागरिक सुरक्षित स्थळी पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...