आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसआयचे माजी प्रमुख हमीद गुल यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकची गुप्तहेर संघटना आयएसआयचे माजी प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल हमीद गुल यांचे शनिवारी रात्री निधन झाले. अत्यंत कट्टरवादी आिण आक्रमक म्हणून कारकीर्द गाजवलेले गुल यांनी काश्मीर व अफगािणस्तानात लढण्यासाठी अतिरेक्यांची फौजच तयार केली होती. ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार गुल यांना मेंदूतील रक्तस्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) मुरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुल यांना लष्करातील हिलाल-ए-इम्तियाज आणि सिताराह-ए-बसालत या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
१९८७ ते ८९ या काळात आयएसआयचे प्रमुख म्हणून गुल यांनी काम पाहिले. या काळात अफगाणिस्तान सोव्हियत फौजा होत्या. या फौजांविरुद्ध लढण्यासाठी गुल यांनी अतिरेक्यांची एक फौजच तयार केली होती. अमेरिकेचा या काळात अफगाणमध्ये सोव्हियतविरुद्ध लढणाऱ्या गटांना पाठिंबा होता. या लढ्यात आयएसआय गुप्तहेर संघटना म्हणून काम करत होती. १९९२मध्ये ते निवृत्त झाले. १९५४ मध्ये लष्करात सहभागी गुल भारत-पाकिस्तानमधील १९६५च्या युद्धात टँक कमांडर होते.