आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सईदचे काम लोककल्याणाचे, त्याची सुटका करा -राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी ताेडले तारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - जमात-उद-दवाचा म्होरक्या व मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदची सुटका करण्यात यावी. त्यांची संघटना ही अतिशय चांगली एनजीआे आहे. त्यांचे काम लोककल्याणाचे आहे, असा कळवळा व्यक्त करत पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी अकलेचे तारे तोडले.
  
सईदची निश्चितपणे सुटका झाली पाहिजे. ते दहशतवादी नाहीत. ते अतिशय चांगली एनजीआे चालवतात. देशात भूकंप किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी त्यांची संस्था धावून जाते. सईद अनेक संघटना चालवतात, असे गौरवोद्गार मुशर्रफ यांनी काढले आहेत. ते पाकिस्तानी टीव्ही वाहिनीशी बोलत होते. सईदचे फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन ही सेवाभावी संस्था आहे. धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात.  तेे तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात काम करतात, असे मला वाटते. ते कोणत्याही दहशतवादी कारवायांत सक्रिय नव्हते, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानी सरकारने सईदला घरातच स्थानबद्ध केले. ९० दिवस सईदला घराबाहेर पडता येणार नाही.  
 
फक्त संशय  
देश म्हणून आपल्याला दहशतवादाबद्दल संभ्रम निर्माण झाले आहेत. तसाच संशय हाफिज सईदबद्दलही झाला आहे, असा दावाही मुशर्रफ यांनी केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील पंजाब प्रांतावर दहशतवादाचे वर्चस्व वाढले आहे. 
 
सौदीकडून पैसे घेतल्याची कबुली  
लंडन व दुबईतील अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी सौदीचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुलझिझ अल सौद यांच्याकडून लाखो डॉलर मिळाले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली, परंतु हे प्रकरण वैयक्तिक असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. 
 
समर्थक काश्मिरात गेल्याने राग  
सईदचे समर्थक स्वत:हून काश्मीरमध्ये गेले होते. तेथे त्यांनी भारताच्या लष्करासोबत संघर्ष केला. ही गोष्ट भारताला आवडलेली नाही. त्यातूनच भारत सईदच्या विरोधात आहे, असा दावाही मुशर्रफ यांनी सदर टीव्ही मुलाखतीतून केला.  
 
पुढील स्लाईडवर वाचा... परदेशी जाण्यावरील बंदी उठवा, म्हणाला हाफिझ सईद
बातम्या आणखी आहेत...