आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफविरुद्ध आणखी 4 खटले भरणार, पाकच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानमधील भ्रष्टाचारविरोधी विभाग अपात्र पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेचे आणखी ४ खटले भरणार आहे. शरीफ यांची अपत्ये आणि अर्थमंत्री इशाक दार यांच्याविरुद्धही खटले भरण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपरप्रकरणी शरीफ यांनी अपात्र ठरवून पंतप्रधानपदावरून हटवले होते. येथील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोचे (नॅब) अध्यक्ष कमर झमान चौधरी यांनी ही माहिती दिली. ६७ वर्षीय शरीफ यांना २८ जुलै रोजी न्यायालयाने अपात्र ठरवले होते. आता नॅब आणखी ४ खटले शरीफ यांच्या विरुद्ध भरेल. २ सप्टेंबर रोजी ईद - उल-अजा असून त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यासाठी ६ आठवड्यांचा अवधी दिला होता. नॅब यासंबंधीचे दस्तऐवज सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल करेल . इस्लामाबाद न्यायालयात याची सुनावणी ११ सप्टेंबरला होणे अपेक्षित आहे.  

नॅबच्या चौकशी समितीसमोर गैरहजर  
नॅबच्या सूत्रांनी सांगितले की, वारंवार हजर राहण्याच्या नोटिशी त्यांनी शरीफ कुटुंबीयांना बजावल्या होत्या. आतापर्यंत ३ नोटिसा बजावल्या असूनही शरीफ कुटुंबीय जबानीसाठी हजर झाले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संयुक्त तपास समितीने अहवाल सादर केला आहे. ब्रिटनमधील महागड्या सदनिका मरयम यांच्या नावावर असल्याचे ब्रिटनच्या कायदा समितीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...