आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांशी चकमकीत पाकचे चार अधिकारी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात लपलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणावर लष्कराने मारलेल्या छाप्यादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाक लष्कराचे चार अधिकारी ठार झाले. त्यात एका मेजरचा समावेश अाहे.

पाकिस्तानमधील चार माेठ्या प्रांतांपैकी एक असलेल्या खैबर पख्तुन्ख्वाॅ प्रांतातील दिर जिल्ह्याच्या शेराेत्काई भागात ही माेहीम राबवण्यात अाली. दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गाेळीबार केला. त्यात मेजर अली सलमान यांच्यासह चार अधिकारी ठार झाले. 

या वेळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात अाले, तर अन्य एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात अाले, असे पाक सैन्य दलाच्या सूत्रांनीसांगितले. दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फेब्रुवारीत सुरू करण्यात अालेल्या ‘रद-उल-फसाद’ या माेहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात अाली. तसेच २००९ मध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी स्वातच्या दिर भागात अशीच माेहीम राबवण्यात अाली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...