आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये आणखी चौघांना फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पंजाब प्रांतात विविध कारागृहांमध्ये मंगळवारी चौघांना फासावर लटकावण्यात आले. खून प्रकरणातील दोषी मोहंमद रियाझ याला सरगोधा कारागृहात, तर अट्टोक कारागृहात दुसऱ्या एका दोषीला फाशी देण्यात आली. तीन वर्षांच्या मुलीच्या अपहरणप्रकरणी अकरम-उल-हक याला ही शिक्षा देण्यात आली. हक दहशतवादी कारवायांत गुंतल्याचाही आरोप होता.
रावळपिंडीत मोहंमद आलम याला हत्येप्रकरणी फाशी देण्यात आली. तर, हुबदर शाह याला मियानवाली कारागृहात दोघांच्या हत्येप्रकरणी फासावर लटकावण्यात आले. पेशावर आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकने फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती उठविली होती.