आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोजमुळे झाली होती कंदील बलोचची हत्या, भावाला नव्हते पसंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदील बलोच - Divya Marathi
कंदील बलोच
इंटरनॅशनल डेस्क- मागील वर्षी आजच्याच दिवशी पाकिस्तानची कन्ट्रॉवर्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध झालेल्या कंदील बलोचची हत्या करण्यात आली होती. कंदीलची हत्या दुसरे तिसरे कोणी नव्हे तर तिच्या सख्या भावाने केली होती. पोलिसांच्या चौकशीत तिच्या दोन्ही भावांनी सांगितले आहे की, कंदीलमुळे आमच्या कुटुंबाची बदनामी होत होती. कंदील केवळ पाकिस्तानातच नव्हे तर भारतातही खूपच फेमस होती. कंदीलने पीएम नरेंद्र मोदी आणि विराट कोहलीवर कमेंट करत खूपच प्रसिद्धी मिळवली होती. भावांनी अशी केली कंदीलची हत्या...
 
- कंदीलच्या हत्ये प्रकरणी आरोपी भावांची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली होती. 
- या चाचणीत स्पष्ट झाले की, 15 जुलै रोजी तिचे भाऊ हक नवाज आणि वसीमने तिची गळा दाबून हत्या केली.
- जियो न्यूजच्या माहितीनुसार, वसीमने कंदीलचे हात पकडले होते तर हकने तिचा गळा दाबला होता. मर्डरच्या आधी कंदीलला फसवून काहीतरी नशेला पदार्थ खायला दिला होता. 
- स्थानिक मीडियानुसार, पोलिस चौकशीत या हत्या प्रकरणी हे ही समोर आले आहे की, सौदीत राहणारा कंदीलचा मोठा भाऊ आरिफनेच भाऊ वसीम आणि नवाजला कंदीलला मारून टाकण्याबाबत दबाव टाकला होता. 
- आरिफचे म्हणणे होते की, कंदीलच्या वागण्यामुळे आणि तिच्या हॉट फोटोजमुळे संपूर्ण कुटुंबांची बदनामी होत आहे. 
 
पुढे स्लाईड्द्वारे पाहा, कंदील बलोच असे कसले फोटोज शेयर करायची ज्यामुळे पिसाळले तिचे भाऊ...
बातम्या आणखी आहेत...