आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘GAY’ मुस्लिम तरूणाचे बॉयफ्रेंडसोबत लग्न, आता मिळताहेत अशा धमक्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीन रोगन आणि जाहेद चौधरी (उजवीकडे) - Divya Marathi
सीन रोगन आणि जाहेद चौधरी (उजवीकडे)
इंटरनॅशनल डेस्क- लंडनमध्ये सध्या एका  ‘गे’ लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर एखाद्या मुस्लिम ‘गे’ चे ब्रिटनमधील हे पहिलेच लग्न आहे. लंडनमध्ये राहणा-या व मूळ बांगलादेशी असणा-या जाहेद चौधरीने आपला 19 वर्षीय बॉयफ्रेंड सेन रोगनसोबत लग्न थाटले आहे. यामुळे त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. स्कूलमध्ये स्टूडंट्स त्याला ‘पिग’ आणि ‘हराम’ बोलवायचे.....
 
- एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये जाहेदने सांगितले की, स्कूलमध्ये स्टूडंट्स त्याच्यावर थुंकायचे. कचरा फेकायचे आणि मुस्लिम स्टूडंट्स त्याला ‘पिग’ आणि ‘हराम’ म्हणून हाका मारायचे. 
- तो गे असल्याचे जेव्हा घरी समजले तेव्हा घरी गोंधळ उडाला. होमोसेक्शुअल असल्याने त्याला शाळेतही आणि घरी टोमणे सहन करावे लागायचे. 
- जाहेद सांगतो की, घरातील लोक याला आजर समजत होते. त्यामुळे मला अनेकदा धार्मिक यात्रांना पाठवले जायचे मात्र काहीही फरक पडला नाही. 
- जाहेद सांगतो की, त्याला खेळणे सुद्धा पसंत नव्हते. तो घरीच एकटा टीव्हीवर फॅशन शो पाहत बसायचा. त्यामुळेही घरचे माझ्यावर बिघडत राहायचे. 
 
आत्महत्येचा घेतला होता निर्णय, तेवढ्यात...
 
 - जाहेद सांगतो की, घरातील आणि बाहेरील लोकांना वैतागून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. 
- अनेकदा प्रयत्न करून आत्महत्या करण्यात यश येत नव्हते. मात्र, त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात नविन घटना घडली. माझी भेट 19 वर्षाच्या सीन रोगनसोबत झाली. 
- जाहेद म्हणतो, एकदा मी एका पार्कमधील बेंचवर बसून रडत होतो. त्याचवेळी सीन रोगन माझ्याजवळ पोहचला. त्याने माझे मनोधौर्य वाढवले. 
- यानंतर जाहेद आणि रोगन यांच्या रोज भेटी होऊ लागल्या. काही काळाने दोघांनाही कळले की, आपण 'गे' आहोत. नंतर त्यांच्यात रिलेशन बनत गेले. 
- समाजाचा विचार न करता जाहेद आणि रोगनने लग्नाचा निर्णय घेतला. जाहेदचा हा निर्णय त्याच्यासाठी जीवघेणा व खूप धोकादायक आहे. मात्र त्याने माघार न घेता पुढे जायचे ठरवले आहे.
 
घरातील लोक लग्नात झाले सहभागी- 
 
- जाहेदने रोगनसोबत आपले नातेसंबंध सांगितले होते. सुरुवातीला घरातील लोकांनी या गोष्टीला विरोध केला. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की त्याला रोखणे कठिण आहे. 
- अखेर रोगन आणि जाहेद विवाह बंधनात अडकले. जाहेदच्या लग्नात त्याची आई, बहिण आणि मोठा भाऊ सहभागी झाला होता. तर रोगनच्या घरातून त्याचे नातेवाईक आणि अनेक फ्रेंड्स सामील झाले होते.  
- जाहेद सांगतो की, लग्नानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र मला त्याची पर्वा नाही. मी माझ्या नव्या आयुष्याबाबत खूपच आनंदी आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...