आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधील गीताची उच्चायुक्त घेणार भेट; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली भेटीची परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- भारतीय सीमेवर भरकटल्यामुळे पाकिस्तानात पोहोचलेली व तिथेच नंतर १४ वर्षे वाढलेल्या गीता नामक मुलीची भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन भेट घेणार आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तसे निर्देशच उच्चायुक्तांना दिले आहेत. सोमवारी रात्री तशी परवानगीही परराष्ट्र मंत्रालयाने राघवन यांना दिली आहे.

स्वत: राघवन, त्यांची पत्नी रंजना आणि परराष्ट्र मंत्रालयाचे काही अधिकारी गीता हिची भेट घेतील. कराचीमधील एका सेवाभावी संस्थेने गीताचा सांभाळ केला आहे. अवघी १० वर्षांची असताना सीमेवर भरकटली आणि पाकिस्तानात पोहोचली. ती मूकबधिर असल्याने नंतर तिचे
काय झाले हे कुणालाही कळाले नव्हते. अचानक दूरचित्रवाणीवर गीताबाबत बातमी अाली आणि ती पाकमध्ये असल्याचे कळाले. गीता मूकबधिर असली तरी खाणाखुणांनी ती आपल्या कुटुंबीयांची भेट घालून द्यावी म्हणून सतत सांगते. सीमेवर ती भरकटली तेव्हा एका
पाकिस्तानी जवानाने तिला पकडले आणि कोर्टाच्या आदेशानुसार एका सेवाभावी संस्थेच्या हवाली केले.

सात भाऊ, चार बहिणी
गीता केवळ खाणाखुणांनी घरच्यांची माहिती देते. त्यानुसार तिला सात भाऊ आणि तीन बहिणी आहेत. ती काहीतरी लिहूनही दाखवते. मात्र, कुणाला कळत नसल्याने १४ वर्षे तिला पाकमध्येच राहावे लागले. विशेष म्हणजे तिला देवाची पूजा करता यावी म्हणून खास खोली तयार करण्यात आली असून हिंदू देव-देवतांचे फोटो या खोलीत लावण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...