आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta Stuck In Pakistan Recognises Her Family In Bihar Will Be Home Soon

चुकून पाकिस्तानात गेलेली गीता भारतात परतणार, DNA टेस्ट नंतर कुटुंबियांना करणार सुपूर्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - अनावधानाने सीमेपार पाकिस्तानात गेलेल्या भारतीय गीताला तिच्या कुटुंबियांनी ओळखले आहे. तिनेही याला पुष्टी दिली आहे. विशेष म्हणजे गीताला ऐकायला येत नाही आणि बोलता देखील येत नाही. तिचे कुटुंब बिहारमध्ये राहाते. दरम्यान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला भारतात परत आणणार असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, 'गीताने तिच्या कुटुंबियांना ओळखले आहे. त्यांची डीएनए टेस्ट केल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधीन केले जाईल.' भारतात गीताचे वडील, सावत्र आई आणि बहिण-भाऊ राहातात.

कोण आहे गीता
>> गीता 14 वर्षांपूर्वी चुकीने पाकिस्तानात पोहोचली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी तिला ताब्यात घेतले होते.
>> रेंजर्सनी तिला 14 वर्षांपूर्वी लाहोरमधील ईदी फाउंडेशनमध्ये नेले होते. नंतर तिल कराचीमधील त्याच संघटनेच्या शेल्टर होममध्ये पाठवण्यात आले.
>> कराचीमधील 'मदर ऑफ पाकिस्तान' नावाने प्रसिद्ध बिलकिस ईदी यांनी तिचे नाव गीता ठेवले होते.
>> फाउंडेशनचे फैसल ईदी म्हणाले, 'तिची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घडवून आणण्यासाठी आम्ही कित्येक वर्षांपासून तिच्या कुटुंबियांचा शोध घेत होतो.'