मरदान- पाकिस्तानात राहणारा 435 किलो वजनाचा अरबाब खीजर हयात हा स्वत:ला जगातील सर्वात ताकदवान असल्याचा दावा करत आहे. तो आधीच पाकिस्तानात हल्क मॅन नावाने प्रसिद्ध आहे. अरबाब आपल्या हाताने टॅक्टर थांबविण्याचा आणि कार ओडतोय याचे वीडियोज समोर आले आहेत. तो वेटलिफ्टिंग चॅम्पियन बनू इच्छितो. डायटमध्ये रोज घेतो 10 हजार कॅलरीज...
- 24 वर्षाच्या अरबाबचे म्हणणे आहे की, ''माझे ध्येय चॅम्पियन बनणे हे आहे. मी अल्लाहचा शुक्रगुजार आहे कारण त्याने मला असे शरीर दिले.
- अशा बॉडीसाठी त्याचा असलेला डेली डायट सुद्धा चकित करणारा आहे. तो रोज 10 हजार कॅलरीजचे फूड घेतो.
- त्याच्या डायटमध्ये सकाळी ब्रेकफास्ट म्हणून 36 अंडी, 3.5 किलो मटण, पाच लीटर दूध आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.
- अरबाबची उंची सुमारे 6 फूट 3 इंच आहे. एवढे वजन असूनही त्याला शरीरिक कसलाही त्रास नाही. तसेच त्याला कोणताही आजार नाही.
- तो म्हणतो, माझे जास्त असलेले वजन मला काहीही त्रासदायक वाटत नाही. ते मी असेच टिकवून ठेवणार आहे कारण मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचे आहे.
- अरबाब पाकिस्तानमधील मरदान येथे राहतो व त्याचे लहान वयात खूप वजन वाढू लागले.
- याबाबत सांगितले जाते की, त्याचे सर्वात मोठे ध्येय आहे ते WWE मध्ये जाणे. मी जबरदस्त न्यूट्रीशियन्ससाठी तज्ज्ञ व डॉक्टरांचा नेहमीच सल्ला घेत असतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...