आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिलगिट-बाल्टिस्तान काश्मिरचेच, पाक व्याप्त काश्‍मीरच्या पंतप्रधानांचा पाकला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फराबाद - जम्मू-काश्मीरच्या प्रश्नी आता पाकव्याप्त (पीआेके) ‘पंतप्रधानांनी’ पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे. गिलगिट -बाल्टीस्तानला पाकिस्तानचा भाग असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करू नका. तो जम्मू-काश्मीरचा अविभाज्य घटक अाहे. अशा शब्दांत ‘पंतप्रधान’ चौधरी अब्दुल मजीद यांनी पाकिस्तानला सुनावले.

चौधरी मजीद म्हणाले, पाकिस्तान गिलगिट-बाल्टीस्तानला संघराज्य प्रदेश बनवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानमध्ये या प्रदेशाचे विलिनीकरण करण्याचा प्रयत्नही काश्मिरी जनतेच्या आत्मनिर्णय संबंधी संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावा अंतर्गत असलेल्या आमच्या भूमिकेला धक्का लावण्यासारखे अाहे, असे मजीद यांनी सांगितले. या अगोदरही अनेक नेत्यांनी देखील गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानचा पाचवा प्रदेश मानण्याच्या प्रयत्नाचा विरोध दर्शवला होता. अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न १९७१ मधील पाकिस्तानच्या विघटनापेक्षाही अधिक घातक ठरेल, असा नेत्यांना वाटते.

कक्षा ओलांडाल तर परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी
आपल्या अधिकार कक्षेत न येणारी पावले पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उचलू नयेत, असा इशाराही मजीद यांनी दिला. गिलगिट-बाल्टीस्तानचे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात पाकिस्तानकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने त्याच्या पुढे जाऊन विचार करू नये. मी १.७५ कोटी काश्मिरींच्या वतीने तुम्हाला (इस्लामाबाद) आव्हान देत आहे की तुम्ही तुमचे विचार बदला. अन्यथा त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवा.

जम्मू-काश्मिरचे उत्तर पश्चिमेकडील प्रदेश
गिलगिट-बाल्टीस्तान हा जम्मू-काश्मिरच्या उत्तर पश्चिमेकडील प्रदेश आहे. पाश्त्यात्य देशांतील नकाशात हा प्रदेश भारतीय सीमेवरून हटवून पाकिस्तानच्या नकाशावर असल्याचे पाहायला मिळतो. दक्षिणेकडे त्याची सरहद्द ( स्वतंत्र काश्मिर म्हटल्या जाणा-या पीआेके तथा पश्चिमेकडील खैबर पख्तुनख्वापर्यंत जाऊन पोहचते. )दक्षिण-पश्चिमेला भारताचे जम्मू-काश्मीर आहे. त्याचे क्षेत्रफळ ७२, ९७१ चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्या सुमारे १८ लाख. राजधानी गिलगिटची लोकसंख्या सुमारे २ लाख १६ हजार ७६० आहे.
बातम्या आणखी आहेत...