आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा, पाकमध्‍ये ६ महिला अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - दहशतवाद विरोधी कारवाईअंतर्गत पोलिस पथकाने आयसिसला मदत पुरवणाऱ्या ६ महिलांना अटक केली आहे. सिंध प्रांतात ही कारवाई करण्यात आली. या महिला आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा करत होत्या. तसेत आर्थिक मदतही करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक उमर खाताब यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

मे महिन्यात दोन श्रीमंत व्यक्तींनी येथील ४५ इस्मायली शिया पंथियांची हत्या घडवून आणली होती. प्रवासी बसमध्ये हे हत्याकांड घडवले गेले. या प्रकरणी तपास करत असताना या व्यक्तींच्या पत्नी आयसिससाठी काम करत असल्याचे उजेडात आले, अशी माहिती खाताब यांनी दिली. मानवाधिकार कार्यकर्ता साबीन मेहमूद यांचीही हत्या याच गटाने केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

धक्कादायक माहिती मिळाली : या गटाचे लॅपटॉप, हार्ड डिस्क व इतर कागदपत्रे आणि यूएसबी स्टिक्सही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यातून त्यांच्या दहशतवादी योजनांची सविस्तर माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. एका सुव्यवस्थित संकेतस्थळाचीही केवळ यासाठीच निर्मिती करण्यात आल्याचे वास्तव यातून समोर आले.
या संकेतस्थळाच्या अॅडमिन्समध्ये स्थानिक प्राध्यापक,लब्ध प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रस्थापित शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी व त्यांच्या पत्नीही सक्रिय असल्याचे उघड झाले. आयसिससाठी काम करणारे मोठे कडे येथे असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे. दरम्यान, गुप्तहेर यंत्रणा अतिशय कुचकामी असल्याचे या घटनेवरून उजेडात आले आहे.

पुढे वाचा.. पूर्वीच कुणकुण होती