आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्याला जिवंत पकडल्याने घाबरला सईद, मुलासह केली ISI बरोबर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमात-उद-दावा चा म्होरक्या हाफीज मोहम्मद सईद. - Divya Marathi
जमात-उद-दावा चा म्होरक्या हाफीज मोहम्मद सईद.
इस्लामाबाद - जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूरमध्ये बीएसएफच्या सुरक्षारक्षकांवर हल्ला करणाऱ्या लश्करच्या दहशतवाद्याला (नावेद) जिवंत पकडल्यामुळे जमात उद-दावाचा म्होरक्या हाफीज मोहम्मद सईद घाबरला असल्याचे वृत्त आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाफीजने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. माध्यमांमधील वृत्तानुसार तीन ते चार दिवसांपूर्वी इस्लामाबादमध्ये ही बैठक झाली. त्यात हाफीजचा मुलगा तल्हा हादेखिल सहभागी झाला होता.

या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबाबत मात्र काहीही माहिती मिळालेली नाही. तल्हा सईद हा बीएसएफवर झालेल्या हल्ल्याच्या मागे संशयित मास्टरमाइंड असल्याचे मानले जात आहे. नावेदने चौकशीमध्ये तल्हाचे नाव घेतले होते. नावेद आता NIA (नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजंसी)च्या कस्टडीमध्ये आहे. त्याला उधमपूरमध्ये सामान्य नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात आली होती. त्याला आधी जम्मूला आणण्यात आले. त्याठिकाणी जॉइंट इंटरोगेशन सेंटरमध्ये त्याच्याबरोबर चौकशी करण्यात आली. त्यानंतर श्रीनगरबरोबरच सहकाऱ्यांबरोबर तो ज्या ज्याठिकाणी राहिला त्याठिकाणी त्याला नेण्यात आले. नुकतेच त्याला NIA च्या टीमने दिल्लीला आणले. आता NIA चे प्रमुख स्वतः त्याची चौकशी करणार आहेत.

संशयितांच्या यादीत JUD
पाकिस्तानने गुरुवारीच जमात-उद-दावा संघटनेचा संशयितांच्या यादीत समावेश केला होता. त्याचे मॉनिटरींगही सुरू करण्यात आले आहे. यूएन रेझोल्युशन 1267 अंतर्गत जमात-उद-दावावर बंदी लादण्यात आली आहे. जमात उद दावा लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा मुखवटा असल्याचे मानले जाते.