आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेक्यांच्या यादीतून नाव वगळावे- हाफिज; संयुक्त राष्ट्रात धाव, म्हणे, आरोप सिद्ध झालेे नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- नजरकैदेतून सुटकेनंतर मुंबई हल्ल्याचा माइस्टरमाइंड हाफिज सईदने आता संयुक्त राष्ट्राकडे आपले नाव अतिरेक्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. लष्कर-ए-ताेयबाची स्थापना करणाऱ्या सईदच्या वतीने लाहोरच्या लॉ फर्मने यूएनमध्ये याचिका दाखल केली आहे. प्रथमच सईदने आपली बाजू मांडण्यासाठी लॉ फर्मची सेवा घेतली आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासह आपल्यावरील इतर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसल्याचा दावा त्याने केला आहे.


मुंबई हल्ल्यानंतर यादीत टाकले होते

नाव यूएनच्या सुरक्षा परिषदेने २६/११ मुंबई हल्ल्यात हाफिजचे नाव आल्यानंतर १० डिसेंबर २००८ मध्ये त्याचे नाव जागतिक अतिरेक्यांच्या यादीत टाकले होते. परिषदेने तोयबाचा संस्थापक आणि अल कैदासोबत त्याच्या संबंधांमुळेही त्याच्यावर बंदी लादली होती. परिषदेेने मे २००५ मध्ये तोयबावर बंदी आणली हाेती. अमेरिकेने सईदवर ६५ कोटींचे बक्षीस जाहीर केलेले आहे.

 

लाहोरच्या लॉ फर्मकडून अधिकृत पेटिशन
> माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 26/11 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदने लाहोरच्या एका लॉ फर्मकडून संयुक्त राष्ट्रकडे आपली याचिका पाठवली आहे. ही याचिका दाखल करण्यात आली त्यावेळी तो नजरकैदेतच होता.
> पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) चे माजी मुख्य वकील नवीद रसूल मिर्झा यांनी या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, नॅबचे माजी अधिकारी नवीज मिर्झा यांचाच मुलगा हैदर मिर्झा यूएनमध्ये हाफिज सईदची बाजू मांडत आहे.
> संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या जगातील कुख्यात दहशतवादी संघटना अलकायदा आणि आयसिससह विविध दहशतवाद्यांच्या यादीत हाफिज सईदचे देखील नाव आहे. तेच नाव यादीतून वगळले जावे अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. अमेरिकेत हाफिज सईदच्या डोक्यावर 1 कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षिस आहे. 

बातम्या आणखी आहेत...