आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदला दणका, नजरकैदेची मुदत पुन्हा 30 दिवसांनी वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद... - Divya Marathi
भारतात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद...
लाहोर- मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि प्रतिबंधित जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदची नजरकैद आणखी ३० दिवसांनी वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील न्यायिक आढावा मंडळाने हा निर्णय दिला. मात्र त्याच्या चार सहकाऱ्यांची नजरकैद वाढवण्यास मंडळाने नकार दिला आहे.  

सईद आणि अब्दुल्ला उबैद, मलीक जफर इक्बाल, अब्दुल रेहमान अबिद आणि काझी काशिफ हुसैन या त्याच्या चार सहकाऱ्यांना गुरुवारी प्रांतीय न्यायिक आढावा मंडळासमोर हजर करण्यात आले. पंजाब सरकारच्या गृहमंत्रालयाने सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या नजरकैदेत तीन महिने वाढ करावी, अशी मागणी केली. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंडळाने हाफिझ सईदच्या नजरकैदेत ३० दिवस वाढ करण्यास मंजुरी दिली. ही ३० दिवसांची वाढीव नजरकैद २४ ऑक्टोबरपासून लागू होईल.  सईदच्या चार सहकाऱ्यांची नजरकैद २५ ऑक्टोबरला संपणार आहे. पण नजरकैदेचा कालावधी संपताच दुसऱ्या प्रकरणात पुन्हा अटक करू शकते.
बातम्या आणखी आहेत...