आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज पुढील वर्षी पाकमध्ये निवडणूक लढवणार; दहशतवादी कारवायांसाठी राजकारणात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने आपल्या महत्त्वाकांक्षा जाहीर केल्या असून पुढील वर्षी होऊ घातलेली निवडणूक जमात-उद-दवा ही  संघटना लढवणार आहे. दहशतवादी कारवायांसाठी राजकारणाचा वापर करण्याचे त्याचे मनसुबे उघड झाले आहेत.


२०१८ मध्ये होणारी निवडणूक लढवण्यासाठी हाफिजने मिल्ली मुस्लिम लीग नावाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर हा नवा पक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याची रीतसर नोंदणी मात्र अद्याप बाकी आहे. मिल्ली मुस्लिम लीगचा (एमएमएल) सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार आहे, असे हाफिजने स्पष्ट केले. संयुक्त राष्ट्र व अमेरिकेने हाफिजला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या म्हणून जाहीर केले आहे. त्याच्या शिरावर १ कोटी डॉलर्सचे इनामही ठेवले आहे. शनिवारी जमात उद दवाच्या मुख्यालयात हाफिज पत्रकारांशी बोलत होता. काश्मीरसाठी आपण नेहमीच तयार असल्याचे सांगून त्याने आपले इरादे स्पष्ट केले. परंतु सईदने संयुक्त राष्ट्राकडे दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव वगळण्यात यावे, यासाठी अर्ज दाखल केला आहे. हाफिजच्या सुटकेनंतर भारताने चिंता व्यक्त केली होती.

 

४० धार्मिक पक्षांच्या शिखर संघटनेचा उपाध्यक्ष

पाकिस्तानात हाफिज सईदने कट्टरवाद्यांना एकत्र करून सातत्याने हिंसक कारवाया घडवून आणल्या आहेत. त्यासाठी ४० धार्मिक तसेच राजकीय पक्षांची शिखर संघटना दीफा-अ- पाकिस्तान कौन्सिलचा तो उपाध्यक्ष आहे. त्या माध्यमातून कट्टरवादी विखारी विचार प्रसृत केले जातात.


काश्मिरींना पाठिंबा सुरूच ठेवणार : सईद

आम्ही काश्मिरींचा आवाज बनणार आहोत. त्यांना आमचा पाठिंबा सुरू राहील. पाकिस्तान सरकारने मागील दाराने राजकारण करणे सोडून दिले पाहिजे. काश्मिरींची समस्या साेडवणे महत्त्वाचे आहे. भारताने काश्मिरींवरील अत्याचार थांबवावे. अन्यथा हा संघर्ष आणखी पुढच्या टप्प्यात जाईल, अशी धमकी सईदने दिली आहे.

 

सुटकेनंतर पुन्हा सक्रिय 

पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने हाफिजची ठोस पुराव्याअभावी सुटका केली होती. त्यास जानेवारीपासून घरातच स्थानबद्ध करण्यात आले होते. २४ नोव्हेंबर रोजी त्याची सुटका झाली होती.आता त्याच्या विरोधात अन्य प्रकरणांत कारवाई करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे.

 

जेम्स मॅटिस आज पाकिस्तान दौऱ्यावर

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेेम्स मॅटिस सोमवारी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मॅटिस पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांसह लष्करासोबत चर्चा करतील. त्यात द्विपक्षीय संबंधाबराेबरच दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा करतील. पाकिस्तान ‘दहशतवाद्यांचा स्वर्ग’ बनला आहे. त्यावरून भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर मॅटिस कानउघाडणी करताना ट्रम्प यांचा संदेश कसा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

'मिली मुस्लिम लीग' पक्षाच्या माध्यमातून उतरणार निवडणूक रिंगणात...

- न्यूज एजन्सीनुसार, सईद याने सांगितले की, त्याची दहशतवादी संघटना 'जमात-उद-दावा' ही 'मिली मुस्लिम लीग' या पक्षाच्या माध्यमातून 2018 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

 चाउबुर्जीमध्ये जमात-उद-दावाचे मुख्य कार्यालय आहे. येथेच आगामी निवडणूक लढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

 

निवडणूक आयोगाचा स्पष्ट नकार...
- दरम्यान, जमात-उद-दावा ने गेल्या ऑगस्ट महिन्यात 'मिली मुस्लिम लीग पक्षाची स्थापना केली होती. परंतु, पाकिस्तान निवडणूक आयोगाने (ईसी) मिली मुस्लिम लीगला राजकीय पक्षाची मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिला होता.
- दरम्यान, सईद विपक्ष किंवा दुसर्‍या राजकीय पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात‍ उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

पुढील स्लाइडवर वाचा... सईद UN च्या ब्लॅक लिस्टमध्ये...

बातम्या आणखी आहेत...