आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदचा पक्ष पाकमध्ये राष्ट्रीय निवडणूक लढणार, भारतासह 3 देशांना म्हटले शत्रू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा राजकीय पक्ष पाकिस्तानात चक्क संसदीय निवडणूक लढवणार आहे. 'मिल्ली मुस्लिम लीग' असे त्याच्या पक्षाचे नाव असून पक्षाच्या प्रवक्त्याने 2018 चे जनरल इलेक्शन सर्वच जागांवरून लढवणार अशी घोषणा केली. 
 

- 'मिल्ली मुस्लिम लीग' पक्षाचा नेता शेख याकूब पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी कुलसूम विरोधात पोटनिवडणुकीमध्ये उभा होता. मात्र, या निवडणूक शेखचा पराभव झाला. 
- त्यानेच आपला पक्ष 2018 मध्ये सर्वच जागांवरून संसदीय निवडणूक लढवणार अशी घोषणा केली. 
- याकूब सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, ही आमची पहिली निवडणूक होती. आम्ही पाकिस्तानला त्याचे शत्रू भारत, अमेरिका आणि इस्रायल विरोधात बळकट करू इच्छितो. पुढच्या वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीत आमचा पक्ष सर्वच जागांवरून निवडणुका लढवणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...