आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदची कोठडी वाढवण्याची पाकच्या पंजाब सरकारची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची कोठडी वाढवून देण्याची मागणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने केली आहे. लोकसुरक्षा कायद्यांतर्गत लाहोरच्या एका न्यायालयाकडे यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे.  दहशतवादविरोधी कायद्यानुसार हाफिज सईदची कोठडी वाढवण्याचा अर्ज सरकारने दोनच दिवसांपूर्वी मागे घेतला होता. 

जमात उद दावा या संघटनेचा म्होरक्या असलेला हाफिज जानेवारी महिन्यापासून त्याच्या घरात नजरकैदेत आहे. मंगळवारी त्याला तीनसदस्यीय प्रादेशिक न्यायिक समीक्षण मंडळासमाेर हजर करण्यात आले. हाफिज तसेच त्याच्या चार साथीदारांच्या नजरकैदेच्या कालावधीत वाढ केली जावी, अशी मागणी या वेळी सरकारी वकिलांनी केली. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मंडळाने पंजाबचे महाधिवक्ता, परराष्ट्र आणि गृहसचिवांना बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर रोजी होईल. हाफिजच्या नजरकैदेची मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. कायद्यानुसार विविध आरोपांखाली तीन महिन्यांपर्यंत कोठडीत ठेवता येते.
बातम्या आणखी आहेत...