आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई हल्‍ल्‍यावर आधारित 'फँटम'वर भडकाला दहशतवादी हाफिज सईद, बॅनसाठी कोर्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहौर - मुंबईमध्‍ये झालेल्‍या 26/11 हल्‍ल्‍यावर आधारित असलेला 'फँटम' या बॉलिवूड चित्रपटावर पाकिस्तानमध्‍ये बंदी घालावी, अशी मागणी जमात-उद-दावा (जेयूडी)चा चीफ हाफिज सईद याने केली. तसेच या बाबत लाहौर हायकोर्टात त्‍याने पिटीशनही दाखल केली आहे. हाफिज हा 26/11 हल्‍ल्‍याचा प्रमुख सूत्रधार असल्‍याचा आरोप भारताकडून होत आहे. दरम्‍यान, अजून हा चित्रपट प्रदर्शित झाला नसून, त्‍याचा केवळ ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपट 28 ऑगस्‍टला प्रदर्शित होणार आहे.
काय आहे हाफिजची मागणी
हफीज याने म्‍हटले, ''फँटममध्‍ये पाकिस्तानी विरोधी कंटेंट आहे. त्‍यामुळे त्‍यावर बॅन आणावा,'' अशी मागणी त्‍याने केली आहे. तसेच आपल्‍या पिटीशनमध्‍ये हाफिज याने या चित्रपटाला पाकिस्तानच्‍या विरुद्ध 'प्रोपेगंडा' म्‍हटले आहे. हाफिजचे वकील अॅड. ए. के. डोगरा यांनी सईदकडून पिटीशन दाखल करताना हा चित्रपट म्‍हणजे 'पाकिस्तान आणि जेयूडीच्‍या विरुद्ध विष आहे,' असा आरोप केला. '' हा चित्रपट 2008 मध्‍ये मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यावर आधारित असून, यातून जेयूडीची जागतिक पातळीवर दहशतवादी म्‍हणून बदनामी करण्‍यात येत आहे, '' असेही त्‍यांनी म्‍हटले.
या बाबी केल्‍या आधोरेखित
लश्कर-ए-तौयबाच्‍या फाउंडरने कोर्टात दावा केला आहे की, मुंबईमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानाचा काहीही रोल नाही, हे पाकिस्‍तानने वेळोवेळी स्‍पष्‍ट केले आहे, ही बाब कोर्टामध्‍ये दाखल करण्‍यात आलेल्‍या पीटिशनमध्‍ये अधोरेखित करण्‍यात आली आहे. लाहौर हायकोर्टाचे न्‍यायाधीश शहीद बिलाल हसन यांनी या पिटीशनवर सुनावणी करण्‍यासाठी 10 ऑगस्‍ट तारिख दिली आहे.

हाफिज याची हल्‍ल्‍यामध्‍ये काय भूमिका आहे
26 नोव्‍हेंबर 2008 रोजी पाकिस्‍तानातून आलेल्‍या दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्‍त्‍वाच्‍या ठिकाणावर अचानक हल्‍ला केला. यामध्‍ये अनेक विदेशी नागरिकांसह 166 लोकांचा मृत्‍यू झाला. यातील हल्‍लेखोरांना पाकिस्‍तान लश्कराचे कमांडर जकी-उर-रहमान लखवी आणि सईद हफीज यांनी दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिली होती.