आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात उष्‍माघातात 1 हजार लोकांचा बळी, 40 हजार लोक त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: कराचीत स्वयंसेवक उष्‍माघाताने त्रस्त असलेल्या लोकांना थंड पाणी देत आहेत. सौजन्य: एपी. )
कराची - सिंध प्रांतात शनिवारपासून(ता.20) असलेल्या उष्माघातात गुरुवारपर्यत 1011 जणांचा बळी गेला आहे. बुधवारी(ता.24) 229 जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे सरकारी आणि खासगी दवाखान्यांनी माहिती दिली. 40 हजार लोक उष्‍माघाताने त्रस्त असून 7 हजार 500 जणांवर जीना पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्‍ये (जेपीएमसी) उपचार चालू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. येथे 311 जणांचा मृत्यू झाला. 40 हजार लोक उष्‍माघाताने त्रस्त असून शनिवारपासून 1 हजारापेक्षा जास्त लोक दगावली आहेत. मृतांपैकी 950 जण ही फक्त कराची शहरातील आहेत, असे वरिष्‍ठ अधिका-याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...