आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाकिस्तानला मुसळधार पावसाचा फटका, 60 लोकांचा मृत्यू, अनेक बेघर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानमध्‍ये रविवारी (ता.तीन) आलेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला. पूर आल्याने 60 लोकांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका खैबर पख्‍तूनख्‍वा आणि गिलगिट बाल्टिस्तानला बसला. हवामान विभागाने येत्या दोन दिवसांमध्‍ये या भागात पाऊस पडण्‍याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचा परिणाम...
- हाजरा आणि मालकंद विभागात भूस्खलन झाल्याने महामार्ग बंद झाला. मुसळधार पावसामुळे नद्या ओसांडून वाहत होत्या. पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.
- खैबरच्या शांगला भागाला सर्वाधिक फटका बसला. येथे 19 लोकांचा मृत्यू, तर 30 लोक जखमी झाले आहेत. यात बहुतेकांची स्थितीत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्‍ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
- शांगला व्यतिरिक्त कोहिस्तान आणि स्वातमध्‍ये परिस्थिती बिकट बनली आहे. येथे वीजपुरवठा खंडित झाली आहे. कोहिस्तान आणि पेशावर भागात 36 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- हवामान विभागानुसार, पेशावरमध्‍ये 24 तासांच्या आत 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- काही वृत्तांनुसार पाकिस्तान लष्‍कराच्या पेशावर येथील तळाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र याबाबत लष्‍कर किंवा सरकारकडून काही सांगितले गेलेले नाही.
- गेल्या वर्षी उन्हाळ्यात येथे मुसळधार पाऊस आणि पूरामुळे 81 लोकांचा मृत्यू झाला होता. 3 लाख लोकांना याचा मोठा फटका बसला होता.
पेशावरमध्‍ये दुकाने वाहून गेली
- पेशावर व्हॅली आणि बारा खोवर सरोवर ओसंडून वाहू लागल्याने परिस्थितीत हालाखीची बनली आहे. 70 पेक्षा जास्त दुकाने पाण्‍याचा वेगवान प्रवाहात वाहून गेले. मुसळधार पावसामुळे घरांचे आणि पिकांचेही नुकसान झाले आहे.
- एकट्या खैबर प्रांतात 40 घरे उद्ध्‍वस्त झाली. पावसामुळे 9 मार्चनंतर 121 लोकांचा मृत्यू झाला, तर 124 जखमी झाले आहेत. दुसरीकडे पडलेल्या घरांची संख्‍या 852 वर पोहोचली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पावसामुळे सर्व सामान्य नागरिकाची दयनीय स्थिती...