आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात प्रथमच अशी साजरी करण्यात आली होळी, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात होळी साजरी करताना तरूणी... - Divya Marathi
पाकिस्तानात होळी साजरी करताना तरूणी...
इंटरनॅशनल डेस्क- भारताप्रमाणेच पाकिस्तानातही यंदा होळी मोठ्या धूमधडक्यात साजरी केली गेली. पाकिस्तानचे हिंदू खासदार डॉ. रमेश कुमार वंकवानी यांनी ही माहिती मीडियाला सांगितली. आपल्या माहितीसाठी हे की, पाकिस्तानातील सिंध प्रांतात मागील वर्षी पहिल्यांदा होळीची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. य दरम्यान बिलावल भुट्‌टोने हिंदू लोकांसमवेत होळी खेळली होती. संसदेत मंजूर झाला होता सुट्टीचा प्रस्ताव...
 
- पाकिस्तानात फक्त दोन टक्के हिंदू लोकसंख्या आहेत. यातील बहुतेक हिंदू सिंध प्रांतात राहतात.
- यापूर्वी ही सुट्टी फक्त हिंदू लोकांना दिली जात होती. मात्र, आता हिंदूसोबतच सर्व पाकिस्तानी नागरिकांना सुट्टी दिली जात आहे.
- हिंदू खासदार डॉ. रमेश कुमार वंकवानी यांनी अल्पसंख्याक कम्युनिटीजच्या सणांसाठी सार्वजनिक सुट्टी देण्याची मागणीचा प्रस्ताव संसदेत मांडला होता. 
- वंकवानी हे मागील अनेक वर्षे पाकिस्तानातील हिंदू सणांसाठी सुट्टी मागत मागत होते. जे मादील वर्षी संसदेने मंजूर केले होते.
 
कोण आहे रमेश कुमार वंकवानी?
 
- खासदार डॉ. रमेश कुमार यांना 2013 मध्ये जनरल इलेक्शनमध्ये रिजर्व कोटा (मायनॉरिटीज) मधून नॅशनल असेंब्ली मेंबर म्हणून निवडले गेले होते. 
- रमेश पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) शी जोडले गेले आहेत. याशिवाय ते पाकिस्तान हिंदू काउंसिलचे प्रमुख आहेत.
 
पाकिस्तानात हिंदूची किती आहे लोकसंख्या?
 
- पाकिस्तानात हिंदूची लोकसंख्या सातत्याने घटत चालली आहे.
- तेथे 20 लाखांहून अधिक जास्त हिंदू आहेत. मागील काही वर्षापासून पाकिस्तानातील सर्व भागातील हिंदू इतर देशांत स्थिरावले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मागील वर्षीच्या होळीच्या सेलिब्रेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...