Home »International »Pakistan» Hindu Marriage Bill Becomes Law In Pakistan

PAK मध्ये हिंदु मॅरेज अॅक्ट मंजूर, शरीफ यांच्या सल्ल्यावर राष्ट्रपतींनी बिल केले मंजूर

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 08:40 AM IST

  • PAK मध्ये हिंदु मॅरेज अॅक्ट मंजूर, शरीफ यांच्या सल्ल्यावर राष्ट्रपतींनी बिल केले मंजूर
इस्लामाबाद - पाकिस्तानात हिंदुंच्या विवाहाशी संबंधित कायदा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदुंच्या लग्नांना कायदेशीर मंजुरी मिळेल. सिंध प्रांत वगळता संपूर्ण पाकिस्तानात लागू होणारा हा पहिला कायदा आहे. सिंध प्रांताचा स्वतंत्र विवाह कायदा आहे.

पंतप्रधानांच्या सल्ल्या नंतर राष्ट्रपतींची मंजुरी
- पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नवाज शरीफ यांच्या सल्ल्यानंतर 'हिंदू मॅरेज अॅक्ट 2017' ला राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी मंजुरी दिली आहे.
- या कायद्याचा उद्देश हिंदु विवाह, त्यांची कुटुंबे, माता आणि मुलांच्या हक्काचे संरक्षण करणे हा आहे.
- गा कायदा पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदुंच्या लग्नांच्या विधी पूर्ण करण्यात मदत करेल असेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
- दुसरीकडे, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे की, त्यांच्या सरकारने कायम पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना समान हक्क मिळेल याचा विचार केला आहे.
- इतर समाजांप्रमाणेच अल्पसंख्याकही तेवढेच देशभक्त आहेत. त्यामुळे त्यांना समान हक्क देणेही देशाची जबाबदारी असल्याचेही शरीफ म्हणाले.

असा आहे कायदा..
- सरकार हिंदुंच्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक भागात मॅरेज रजिस्ट्रार अपॉइंट करेल.
- हा कायदा वैवाहिक हक्क प्रदान करण्याबरोबरच, कायदेशीररित्या विभक्त होणे, लग्न तुटणे किंवा संमतीने वेगळे होणे असा प्रकरणांत पत्नी आणि मुलांना आर्थिक संरक्षण प्रदान करतो.
- त्याशिवाय हा कायदा विवाहित पुरुषाला पुन्हा विवाह करणे किंवा विधवेला पुनर्विवाहाची मान्यता (यात महिलेचा होकार आणि कालमर्यादा निश्चित आहे) हे हक्कही प्रदान करतो. अनावरस अपत्यांनाही कायदेशीर हक्क देण्यात आला आहे.
- हा कायदा बनण्यापूर्वी झालेल्या लग्नांनाही मान्यता मिळेल. त्यासाठी याचिका कौटुंबीक न्यायालयात सादर होतील.

कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि १ लाख दंड
- हा कायदा तोडल्यास तुरुंगवास आणि एक लाखांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.
- सिंध प्रांत वगळता संपूर्ण पाकिस्तानात लागू होणारा हा पहिला प्रांत आहे. सिंध मॅरेज अॅक्ट वेगळा आहे.
- पाकिस्तानी संसदेने 10 मार्चला हा कायदा मंजूर केला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended