आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हिंदू\' म्हणून खिल्ली उडवल्याने पाक खासदाराचे खरमरीत प्रत्युत्तर, पाहा Video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - वारंवार खिल्ली उडवली जात असल्याने त्रासलेल्या पाकिस्तानच्या एका हिंदू खासदाराने अखेर या मुद्यावर प्रखरपणे आवाज उठवला आहे. संसदेतील इतर नेते 'गायीची पुजा करणारे' आणि 'हिंदू-हिंदू असे टोमणे मारत असल्याने खासदार लाल मालही हे चांगलेत संतापले. अखेर त्यांनी संसदेचे कामकाज सुरू असतानाच त्याला विरोध दर्शवला आणि संसदेलाही त्यांचे ऐकावे लागले.

हा प्रकार 20 जून रोजीचा आहे. पाकिस्तानात सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान कामकाज सुरू असताना मध्येच खिल्ली उडवण्यासाठी म्हणून काहीही बोलण्याचे प्रकार होत होते. त्यावर संतप्त खादार मालही म्हणाले की, आम्ही हिंदू असलो तरी पाकिस्तानी नागरिक आहोत. त्यामुले धार्माच्या आधारावर आमची खिल्ली उडवली जाता कामा नये. त्यांच्या या प्रत्युत्तराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लाल यांचे उत्तर...
यावेळी बोलताना लाल म्हणाले की, जमशेद दस्ती आणि माजी पंतप्रधान मीर जफुरल्ला खान जमाली, हिंदू तर गायीची पुजा करतात असे म्हणत होते. ते ऐकूण मला धक्काच बसला. सभापतींनी त्यांना बसायला सांगितले तेव्हा ते म्हणाले की, मी सभागृहाचे कामकाजाचे नियम वाचले आहेत आणि मी त्यांचा आदरही करतो. आपले ज्येष्ठ राजकारणी आहेत, त्यांचाही मी आदर करतो. पण तीन ते चार दिवसांपासून अशा प्रकारे आमची खिल्ली उडवण्याचा प्रकार सुरू आहे. एकदा म्हटले गेले, हिंदू गायीचे पुजारी आहेत. आम्ही गायीची पुजा करुच तो आमचा अधिकार आहे. आम्हाला टोमणे मारले जातात. हिंदू हिंदू म्हणून आम्हाला हिणवले जाते. पण आम्ही तर पाकिस्तानी आहोत ना, मग हे आम्हाला हे आमचेच पािकस्तानी बांधव आहेत असे का नाही म्हणून शकत? असा सवाल त्यांनी केला.

लाल एवढे बोलूनच शांत झाले नाहीत ते म्हणाले की, यांनी भारताला शिव्या घालायच्या असतात पण हे हिंदुंना शिव्या घालतात. मग आमचा गुन्हा नेमका काय आहे. या सभागृहात हे वारंवार घडत आहे. मी बऱ्याच दिवसांपासून हे पाहतोय. परवा एका हिंदू मुलाचे अपरहपण करून त्याला बळजबरीने हिंदू बनवण्यात आले. पण त्यावर कोणीही बोलले नाही. इथे मात्र टोमणे मारत आणि खिल्ली उडवत बसतात. पण आम्ही आता हे सहन करणार नाहीत. आम्ही पाकिस्तानी आहोत, आणि आम्हालाही तेवढाच अधिकार आहे. एखाद्याला हिंदुबाबत बोलायचेचे असेल तर बळजबरी धर्मांतर केलेल्या त्या लहान मुलाबाबत बोलावे.
पुढील स्लाइडवर पाहा, लाल यांचे प्रत्युत्तर असलेला VIDEO
बातम्या आणखी आहेत...