आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या सिंधमध्ये मंदिरात तोडफोड;गटारीत आढळल्या मूर्ती, तीन जणांवर गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 कराची- पाकिस्तानच्या सिंध प्रांतात शुक्रवारी रात्री एका हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी मूर्ती भंजन केल्याचे उजेडात आली. हे मंदिर थटा जिल्ह्यातील गारो परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर आहे. कराचीपासून सुमारे ६० किलो मीटर अंतरावरील या परिसरात हिंदू बहुल वस्ती आहे. सुमारे २ हजार उंबऱ्यांचा हिंदू समुदाय येथे आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात तीन जणांच्या विरोधात दहशतवाद व ईशनिंदेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारी फिदा हुसेन मस्तोई म्हणाले, आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्राथमिक तपासात मंदिर परिसरात १२ वर्षीय मुलाच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

स्थानिक हिंदू समुदायातील लोकांच्या मते काही भाविक रात्री उशिरापर्यंत मंदिरात पूजा करत होते. रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी पुजेसाठी भाविक मंदिरात येत होते. तेव्हा मंदिरातील मूर्ती गायब झाली होती. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे.

मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...
- न्यूज एजन्सीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेले वृत्त असे की, ही घटना काल (शुक्रवार) थट्टा जिल्ह्यातील घारो गावात घडली आहे. कराचीपासून हे गाव 60 किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या 2000 असून ते सर्व हिंदु आहेत.
- 'डॉन'च्या अहवालानुसार, हिंदु देवी-देवतांच्या मूर्तींची विटंबना केल्याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

पोलिसांचा अल्पवयीन मुलावर संशय...
- 'बीबीसी उर्दू'ने पोलिस अधिकारी फिदा हुसैन मस्तोई यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केलेले नाही.
- फिदा यांनी सांगितले की, मंदिरात आढळलेल्या बोटाच्या ठस्यांनुसार एका अल्पवयीन मुलावर संशय व्यक्त करण्‍यात येत आहे. तो 12 वर्षाचा आहे.
- स्थानिक हिंदु नगरसेवक लाल माहेश्वरी यांनी सांगितले की, आरोपी पहाटे 5 वाजेच्या सुमारास आरोपी मंदिरात दाखल झाला असावा. त्याने मंदिरातील साहित्याची तोडफोड केली. इतकेच नाही तर देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना केली. मूर्ती गटारीत फेकल्या.
- मंदिरात सकाळी पूजा करण्यासाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात ही बाब आली. मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडल्याचे लाल माहेश्वरी यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...