इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानमध्ये जवळपास सहा दशकानंतर हिंदू विवाह कायदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहात संमत करण्यात आला आहे. आता वरिष्ठ सभागृहात हे सहज संमत होऊ शकते. या कायद्यानंतर येथील अल्पसंख्याक हिंदूंच्या विवाहांची नोंदणी होऊ शकेल. हा कायदा नसल्याने हिंदू स्वत:ला असुरक्षित मानत होते. पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाचे प्रमुख जोहरा युसूफने सांगितले, की या कायद्यामुळे महिलांना घटस्फोट घेण्याबरोबरच जबरदस्तीने विवाह किंवा 18 वर्षापूर्वी विवाह करण्यासाठी दबाव आणल्यास पोलीसांकडे तक्रार करण्याचे अधिकार मिळेल. पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या केवळ 2 टक्के आहे. या देशात हिंदूंच्या छळवणुकीचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. कधी त्यांच्या तरुण मुलींचे अपहरण केले जाते, तर कधी त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जायचे. चला जाणून घेऊ या पाकिस्तानी कशा प्रकारे हिंदूंची छळवणूक करते...