आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If There Is No Discussion Of Kashmir : Turn Back To Pakistan

काश्मीर नसेल तर चर्चा नाही : पाकिस्तानचे पुन्हा घूमजाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात ‘चांगल्या वातावरणात’ झालेल्या चर्चेची वस्तुस्थिती समोर आली आहे. चर्चा पुन्हा सुरळीत होईल, असे वाटत होते, पण तीन दिवसांनंतर पाकिस्तानने भारतासमोर पुढे केलेला हात झिडकारला. आपल्या जुन्याच भूमिकेवर ठाम राहताना, काश्मीर मुद्दा कार्यक्रम पत्रिकेत नसला तर भारतासोबत कुठलीही चर्चा होऊच शकत नाही, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
दोन्ही पंतप्रधानांच्या रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले होते. पाकिस्तानमधील मुंबई हल्ल्याच्या खटल्याला वेग दिला जाईल, असे त्यात म्हटले होते. हल्ल्याचा मास्टरमाइंड जकीऊर रहमान लखवी याच्या आवाजाचा नमुना देण्यावर सहमती झाली होती. पण रविवारी पाकिस्तानच्या सरकारी वकिलांनी लखवीच्या आवाजाचा नमुना घेण्यासाठी न्यायालयात अर्ज देण्यास नकार दिला होता.
आता पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारविषयक पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे की, ‘आम्हाला मुंबई हल्ल्याचा खटला संपवण्यासाठी आणखी पुरावे हवेत. संयुक्त निवेदनातही हा मुद्दा अतिरिक्त माहितीत समाविष्ट होता.’ अशा प्रकारे त्यांनी भारतावर पुन्हा
जबाबदारी ढकलली.
सरताज यांनी केला नवाझ शरीफांचा बचाव
दोन्हीदेशांच्या संयुक्त निवेदनात काश्मीरचा उल्लेख नव्हता. त्यामुळे पाकिस्तानाच शरीफ यांच्यावर टीका होत आहे. अजीज त्यांच्या बचावासाठी उतरले. ते म्हणाले, ‘आम्ही काश्मिरी बांधवांना राजकीय, नैतिक आणि कूटनीतिक सहकार्य देत राहू ही सैद्धांतिक भूमिका पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांत स्पष्ट केले होते. आम्ही त्यावर कायम आहोत. शरीफ यांनी समझौता स्फोट आणि बलुचिस्तानमध्ये भारतीय हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला होता.’

विभागीय शांततेसाठी प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारे सोडवणे आवश्यक
सरताजअजीज यांच्या म्हणण्यानुसार, शांतता आणि विकास यांना प्रोत्साहन देणे ही भारत आणि पाकिस्तान यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा आवश्यक आहे. काश्मीर, सियाचीन, सर क्रीक, हस्तक्षेप आणि पाणी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते पडद्यामागील वाटाघाटींद्वारे सोडवले जातील. वेगवेगळ्या चॅनल्समार्फत त्यांचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार भेटणार आहेत. ते आधी नवी दिल्लीत आणि नंतर इस्लामाबादमध्ये भेटतील. त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.
बैठकीमुळे तणाव कमी झाला
अजीजम्हणाले, उफा बैठक ही चर्चा प्रक्रियेची औपचारिक सुरुवात म्हणता येणार नाही. पण तणाव कमी करण्यात निश्चितपणे यश मिळाले आहे. दोन वर्षांपासून आम्ही दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भारताने आमच्यावर आरोप करू नयेत.
एक घुसखोर अतिरेकी ठार
श्रीनगर।जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी घुसखोरीचा प्रयत्न करणारा दहशतवादी ठार झाला. पूंछ जिल्ह्यात मेंढर बलनोई सेक्टरमध्ये ही चकमक झाली. लष्कराने गेल्या आठ दिवसांत घुसरेाखीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडला आहे.