आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नात कदाचित ‘तिसऱ्या वेळी सुदैवी’ ठरेन : इम्रान खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/लंडन - लग्नाबाबतचा माझा अनुभव खूप चांगला नाही, पण कदाचित ‘तिसऱ्या वेळी सुदैवी’ ठरेन, असे वक्तव्य माजी क्रिकेटपटू तथा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी रविवारी केले.

लंडनमध्ये कौटुंबिक मित्राच्या मुलीच्या विवाह समारंभात पाहुण्यांशी बोलताना इम्रान खान म्हणाले की, ‘मी तुम्हाला विवाहाबाबत चांगला सल्ला देऊ शकत नाही, कारण याबाबतीत माझे ट्रॅक रेकॉर्ड चांगले नाही. कदाचित तिसऱ्या वेळी मी सुदैवी ठरेन.’ खान (६४) हे नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर आले होते. ‘डॉन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

इम्रान यांनी १९९५ मध्ये जेमिमा गोल्डस्मिथशी आणि २०१५ मध्ये रेहम खानशी केलेल्या विवाहाचा उल्लेखही केला. ते म्हणाले की, ‘माझा लग्नाबाबतचा इतिहास पाहता मी नवदांपत्याला सर्वोत्कृष्ट सल्ला तर देऊ शकत नाही, पण मी त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. माझ्यापेक्षा तुमचा विवाह जास्त यशस्वी ठरेल, अशी माझी अपेक्षा आहे.’ या वेळी उपस्थितांनी इम्रान खान यांच्या भाषणाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. इम्रान खान लवकरच तिसरे लग्न करणार, असे भाकीत वर्तवले जाते आहे. एवढेच नव्हे तर लंडनमध्ये एका समारंभात ते विवाहबद्ध झाले, अशी अफवाही पसरली होती, पण ती खोटी ठरली.
बातम्या आणखी आहेत...