आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकची सीमा जगात सर्वाधिक धोकादायक; कुठे, कशी आहे सीमा, जाणून घ्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानचे नागरिक आता बिना पासपोर्टचे शेजारील देश अफगाणिस्तानात जाऊ शकणार नाही. अफगान सरकारने पाकिस्तानी लोकांना डॉक्यूमेंट्सशिवाय देशात घुसण्यास बंदी घातली आहे. हे नियम 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. हे पाऊल दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी उचलले गेले आहे. 
 
असे असले तरी हे प्रकरण पाकिस्तान-अफगाणिस्तानपर्यंतच सीमित नाही. मात्र, असे काही जगात देश आहेत जे सीमेवरून वाद किंवा घुसखोरीचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक देशांच्या सीमा सर्वात धोकादायक मानल्या जातात. भारत-पाक सीमा त्यातील पैकी एक. गेल्या वर्षी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्‍या तळावर हल्‍ला केला होता. हे दहशतवादी भारतात कसे घुसले, त्‍यांनी शस्‍त्र कशी आणली, असे अनेक प्रश्‍न केले गेले होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारत- पाकिस्तानच्‍या आंतरराष्‍ट्रीय सीमेबद्दल माहिती...
 
अनेक राज्‍यात लागते भारत-पाकिस्‍तान सीमा-
 
भारतातील पंजाब, गुजरात, राजस्‍थान आणि काश्मिर या राज्‍यांना पाकिस्‍तानची सीमा लागते. शिवाय पाकिस्‍तातून समुद्री मार्गे मुंबईत घुसखोरी करता येते.
 
नेमका कुठे आहे पाकिस्‍तान ?
 
भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नैर्‌ऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र व ओमानचे आखात असून देशाला 1046 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
 
असे आहे सीमेचे क्षेत्रफळ-
 
राज्‍य सीमेची लांबी (किमीमध्‍ये )
 
जम्‍मू-काश्मिर - 1225
पंजाब - 553
राजस्‍थान - 1037
गुजरात - 508
एकूण - 3323
 
पुढील स्‍लाईड्सवर जाणून घ्‍या, जगातील सर्वाधिक धोकादायक सीमेपैकी एक असलेल्या भारत-पाकिस्‍तान सीमेबाबत माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...