ग्वादर - पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल रहील शरीफ यांनी पुन्हा गरळ ओकली आहे. भारत ('रॉ') पाकला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून आम्ही कदापि तो सहन करणार नाही. सर्व ताणतणाव साेडून भारताने सहकार्य करावे, अशा उलट्या बोंबा त्यांनी या वेळी मारल्या आहेत.ग्वादर बंदरात आयोजित एका संमेलनात शरीफ यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, चीन-पाकिस्तान आर्थिक सहकार्यामुळे भारताच्या भुवया उंचावल्या असून त्यांनी या योजनेचा उघडपणे विरोध केला आहे. मात्र, यामुळे पाकिस्तानात शांतता आणि समृद्धी येईल, असा त्यांचा दावा आहे.