आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भारताला दीर्घकाळ विरोध करू शकत नाही’,पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांच वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती असतानाच गुरुवारी पाकिस्तानी उच्चायुक्तांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले की, आमचा देश प्रदीर्घ काळपर्यंत भारतासोबत तणावात आणि विरोधात राहू शकत नाही.

बासित म्हणाले की, दोन्ही देशांनी तणावात ७० वर्षे व्यतीत केली आहेत. आता संबंध कसे असावेत, हे दोन्ही देशांनी आपसात ठरवायचे आहे. पाकिस्तान सहकार्य करण्यास तयार आहे, पण भारताकडून त्याबाबत उत्तर मिळालेले नाही. पठाणकोट, उरी आणि नगरोटा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...