आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1971 WAR: पाक सैनिकांचा जोधपूरमध्ये 'डिनर' करण्याचा होता मनसुबा, असे भंगले स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाक सीमेवरील राजस्थानमधील हीच ती लोंगवाला पोस्ट... - Divya Marathi
भारत-पाक सीमेवरील राजस्थानमधील हीच ती लोंगवाला पोस्ट...
इंटरनॅशनल डेस्क- 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात राजस्थानमधील लोंगेवाला पोस्टवर झालेला संघर्ष युद्धाचा टर्निंग पाँइंट मानला जातो. पूर्व पाकिस्तानमध्ये पाक लष्कराच्या क्रूर अत्याचारामुळे 1971 मध्ये 3 डिसेंबर रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानर हल्ला केला. पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश)चा प्रश्न आमचा अंतर्गत बाब आहे असे सांगत पाक यामुळे भडकला. त्यामुळे पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा मनसुबा रचला. त्यामुळे पाकिस्तानच्या दोन हजार सैनिकांनी 4 डिसेंबरच्या रात्री म्हणजे 5 डिसेंबर सुरु होताच राजस्थान येथील भारत-पाक सीमेवरून हल्ला करण्याचे नियोजन झाले. 'लोंगेवालमध्ये नाष्टा, रामगडमध्ये लंच आणि जोधपूरमध्ये डिनर' असे स्वप्न उराशी बाळगून पाकने भारतीय सैनिकांवर हल्ला केला. मात्र, भारताने पाकिस्तानचे हे स्वप्न धुळीस मिळवले.
पूर्ण तयारीनिशी पाकने केला होता हल्ला-
- भारत-पाक सीमेवरील राजस्थानमधील लोंगेवाल पोस्ट आज 'इंडो-पाक पिलर 638' नावाने प्रसिद्ध आहे.
- राजस्थानच्या थार वाळवंटात भारत- पाकिस्तानच्या सैन्यादरम्यान 4 डिसेंबरच्या रात्री संघर्ष पेटला.
- 5 डिसेंबरची सकाळच या वृत्ताने गाजली. त्यावेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी पाकला चोख प्रत्त्युत्तर देण्याचे आदेश लष्कराला दिले.
- 2000 सैनिकांसह पाकिस्तानने हा हल्ला केला होता.
- पाकिस्तानी सैन्याकडे 50 हून अधिक टँक होते. तर, दुसरीकडे भारतीय जवानांकडे कमी क्षमतेची हत्यारे होती.
- त्यानंतरही त्यांनी पाकिस्तानी फौजेला सीमेवर सहा तास झुंजवत ठेवले आणि जोपर्यंत भारतीय हवाई दलाची मदत मिळत नाही तोपर्यंत त्यांना पुढे येऊ दिले नाही. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला जीव वाचवत मागे फिरावे लागले.
भारताने दोन तर पाकने 200 सैनिक गमावले होते-
- पंजाब रेजिमेंटच्या 120 जवानांशिवाय बीएसएफच्या काही सुरक्षा रक्षकांनी दोन हजार पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावले होते.
- पाकिस्तानने येथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला खरा परंतू त्यांना यश आले नाही.
- या युद्धात भारताचे दोन जवान शहीद झाले होते तर पाकिस्तानने 200 सैनिक गमावले होते.
- भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईच्या जोरावर पाकिस्तानला काढता पाय घ्यावा लागला.
- त्याशियाव 34 टँक आणि 500 हून अधिक शस्त्रसज्ज पाकची वाहने भारताने जप्त केली होती.
हा विजय चमत्कारापेक्षा कमी नव्हता-
- राजस्थानातील लोंगावाल पोस्टवर भारताने मिळवलेला विजय हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता.
- मेजर कुलदीपसिंह चांदपुरी येथे पंजाब रेजिमेंटच्या 23 व्या पटालियनसोबत पाय रोवून उभे होते.
- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यानंतर त्यांनी हेडकॉर्टरला बॅकअप मागितला, मात्र पहाटेच्या आधी मदत येण्याची कोणतीही शक्यता नव्हती.
- त्यामुळे फक्त एका बटालियनच्या जोरावर त्यांनी संपूर्ण पाकिस्तानी फौजेला रात्रभर रोखून धरले.
- मेजर चांदपुरी यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एक तर बटालियनसह पोस्टवर उभे राहाणे आणि दुसरे माघारी फिरणे.
- त्यांनी निधड्या छातीने तिथेच उभे राहून सामना करण्याचा निर्णय घेतला. एका बंकरमधून दुसऱ्या बंकरमध्ये जात ते सहकार्यांचे मनोधैर्य वाढवत होते.
- मेजर चांदपुरी यांनी वायूदलाची मदत मागितली होती, मात्र त्याकाळी फायटर जेट रात्री उड्डाण करण्यात सक्षम नव्हते.
- 5 डिसेंबरच्या सकाळी दिवस उजाडल्यानंतर विमाने येऊन पोहोचली आणि पाकिस्तानच्या सैन्याची धुळधाण उडवली.
- अशा प्रकारे पाकिस्तानचे 'लोंगेवालमध्ये नाष्टा, रामगडमध्ये लंच आणि जोधपूरमध्ये डिनर' असे स्वप्न भारताने भंगवले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लोंगवाला पोस्टचे आणखी फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...